शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाडांना अटक करा

By admin | Updated: July 22, 2015 02:11 IST

संभाजीराव भिडे गुरूजी व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका करणाऱ्या आमदार ...

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन गोंदिया : संभाजीराव भिडे गुरूजी व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याची मागणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानने केली आहे. यासाठी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख दुर्गेश रहांगडाले यांच्या नेतृत्वात तहसीलदार संजय पवार यांना मंगळवारी (दि.२१) निवेदन देण्यात आले.भिडे गुरूजी राजकारण, अर्थकारण व सत्ताकारण बाजूला ठेऊन कोणताही जातीय द्वेषभाव न बाळगता केवळ देशहितार्थ काम करीत आहेत. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या माध्यमातून ते राष्ट्रकार्य करीत आहेत. तर बाबासाहेब पुरंदरे यांनी सत्तर पेक्षा जास्त वर्षे शिवचरित्रावर सखोल संशोधन करून, हजारो अस्सल कागदपत्रांचा अभ्यास करून अत्यंत स्फूर्तीप्रेरणादायी शिवचरित्र लिहीले आहे. आजवर लाखो लोकांनी त्यांची पारायणे करून त्यातून देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा घेतली आहे. असे असतानाही आमदार आव्हाड यांनी केवळ जातीय भावनेतून द्वेषपूर्ण व्यक्तव्ये करीत गावोगावी फिरत आहेत. हाच प्रकार त्यांनी १९ जुलै रोजी सांगली येथे केला. याप्रकरणी त्यांच्यावर सांगली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशाच्या आणि राज्याच्या एकसंधतेच्या दृष्टीने हे अत्यंत घातक असल्याने आमदार आव्हाड यांना त्वरीत अटक करून कठोर कारवाईची मागणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानने केली आहे. यासाठी संघटनेच्यावतीवे मंगळवारी (दि.२१) तहसीलदार पवार यांना निवेदन देण्यात आले. तसेच यानंतरही आव्हाड यांचे हे कृत्य थांबले नाही तर शिवप्रतिष्ठान आपल्या पद्धतीने त्यांना धडा शिकविणार असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना शिवप्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख रहांगडाले यांच्यासह उपजिल्हाप्रमुख सुरेंद्र नारनवरे, सोनू रहांगडाले, मोनू मानकर, जयरामसिंह जतपेले, निशू जोशी, बाबा बिसेन, गोलू जोशी, कमलेश बनकर, अनील पारधी, राजू कवास, सुमित नेवारे, राकेश लांजेवर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)