शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रानटी पशूंचा बंदोबस्त करा

By admin | Updated: October 6, 2016 01:05 IST

तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा (काचेवानी) क्षेत्रात रानडुकरांनी धानपिकांची नासाडी केली.

वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना निवेदन : बरबसपुरा येथील शेतकरी त्रस्त काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा (काचेवानी) क्षेत्रात रानडुकरांनी धानपिकांची नासाडी केली. माकडांमुळे घरांची व भाजीपाला पिकांची नासाडी होत असून यावर वन विभागाने उपाययोजना करावी, याकरिता सरपंच ममता लिचडे यांनी शेतकऱ्यांसह जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन दिले. बरबसपुरा येथील शेतकरी रानडुकरांनी केलेल्या धानपिकांच्या नासाडीने त्रासले आहेत. नुकसान भरपाई दावे करताना वनविभागाद्वारे त्रासदायी व जाचक अटी लादल्या जातात. यावर चर्चा करण्याकरिता व वन्यप्राण्यांची समस्या संबंधात जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या उपस्थितीत सरपंच ममता लिचडे यांनी वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम यांची भेट घेतली व निवेदन दिले. दिवसेंदिवस रानडुकरांची व माकडांची समस्या वाढत चालली असून आहे. ही बाब वनविभागाने गांभीर्याने घेवून रोकथाम करण्याची उपाययोजना करावी, अशी मागणी केली. याला कवलेवाडा क्षेत्राचे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी दुजोरा दिला. यावर वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम यांनी रानडुकराला मारण्याची परवानगी मागितल्यास आपण देवू शकतो, मात्र मारायचे कसे ते आपण ठरवावे आणि कायदा पालनाची काळजी घ्यावी, असे सांगितले. त्रासदायी समस्यांमुळे नुकसान भरपाईचे दावे करणे अनेक शेतकरी टाळतात. काही शेतकरी दावे सादर करतात, तेव्हा कर्मचारी रूपयांची मागणी करतात. स्वाक्षरीसाठी शेतकऱ्यांना त्रास देतात, अशी समस्या जि.प. सदस्य डोंगरे व सरपंच ममता लिचडे यांच्यासह शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसमक्ष मांडली. यावर कृषी विभागाला वगळण्याचे आदेश वन विभागाने दिले असून नुकसान भरपाई दाव्यांना विलंब होणार नाही, हे यामागील मुख्य उद्देश्य असल्याचेही राऊंड आॅफीसर व्ही.सी. मेश्राम यांनी सांगितले. वनविभागाने रानडुक्कर आणि माकडांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या नाही तर शेतकऱ्यांचे शेतात व नागरिकांचे घरी राहणे भविष्यात कठिण होईल, असे जि.प. सदस्य डोंगरे यांनी यावेळी सांगितले. सद्यस्थितीत शेतकरी एकटे शेतात जाण्यास घाबरत असल्याचे सरपंच ममता लिचडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सांगितले. वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम आणि क्षेत्रीय वनाधिकारी व्ही.सी. मेश्राम यांनी उपस्थितांना सांगीतले की, आमच्याकडे वन आणि प्राणी यांच्या सरंक्षणाची जवाबदारी असल्याने आम्हाला सर्वदूर परिस्थिती माहिती असली तरी काही करू शकत नाही. याकरिता राजकीय लोकसेवकांनी या समस्या शासनासमक्ष ठेवाव्या. त्यावर शासन उपाययोजना ठरवू शकतो, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिष्टमंडळात जि.प. सदस्य मनोज डोंगरे, सरपंच ममता लिचडे, अशोक लिचडे, माणिकराम कटरे, बाळू पारधी, नेतराम माने, श्याम नागपुरे, उमाशंकर लिल्हारे व बरबसपुरा येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)अनुसूची ३ मधून वगळणे गरजेचे रानडुकर आणि माकड अनुसूची-३ मध्ये मोडतात. रानडुकरांची उत्पत्ती फार मोठी असल्याने दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. माणसापेक्षा हिंसक पशूंची किंमत अधिक का? असा प्रश्न मनोज डोंगरे आणि ममता लिचडे यांनी उपस्थित केला. यावर वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम यांनी सांगीतले की, वन्यप्राणी हे अनुसूची ३ मध्ये सरंक्षित असल्याने त्यांना मारण्याची परवानगी नाही. या प्राण्यांना अनुसूची तीनमधून काढण्यात आले आणि सरसकट मारण्याची परवानगी देण्यात आली तर हे शक्य आहे. परंतु हे अधिकार शासनाला असल्याने लोकप्रतिधिंनी शासनाच्या निदर्शनात आणून देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत शासनाच्या व विभागाच्या बंधनात असल्याने धानपीक व इतर नासाडीच्या नुकसान भरपाई संबंधात दावे नियमानुसार मंजुरीसाठी पाठविले जातील. अधिक त्रास होणार नाही, असे सांगून त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.बंदोबस्तासाठी तीन उपाय रानडुकरांच्या बंदोबस्ताकरिता बाजारात राऊंड बॉक्स उपलब्ध आहेत. हे यंत्रामुळे शेतात वनराजासह अनेक ध्वनी निर्माण करीत असल्याने रानडुकरे त्या परिसरात येत नाहीत. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखे असल्याचे दिसून येत नाही. याची किंमत दोन हजारापासून १८ हजारापर्यंत आहे. गरजू शेतकऱ्यांना साऊंड मेमरीमध्ये वनविभागातून आवाज उपलब्ध करून देता येईल, असे वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस.कदम यांनी सांगितले. दुसरा उपाय म्हणून त्यांनी सांगितले की, लाल मिरची लावावी. त्यात रॉकेल ओतून शेतात जाळल्यास त्याची तिरवट धूर परिसरात पसरेल. रानडुकर ही खालमानी असल्याने धुरामुळे शेतात येणार नाही. परंतु हे प्रभावशील होईलच, असे म्हणता येत नाही, असेही ते म्हणाले.