शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनी मोरगाव बस आगारासाठी प्रयत्नशील-बडोले

By admin | Updated: January 17, 2015 23:00 IST

आमदार झाल्यापासून आदिवासी उपयोजनेतून अर्जुनी मोरगाव बसस्थानकासाठी प्रयत्न केले. तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री व राज्यसभेचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी

अर्जुनी-मोरगाव : आमदार झाल्यापासून आदिवासी उपयोजनेतून अर्जुनी मोरगाव बसस्थानकासाठी प्रयत्न केले. तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री व राज्यसभेचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी स्थानकासाठी ५ लाख रुपये दिले. आगामी काळात बसफेऱ्या वाढविण्यावर भर देणार असून बस आगार उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी येथील बसस्थानक लोकार्पण सोहळ्याप्रसंगी दिली.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आ.दयाराम कापगते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश गहाणे, पं.स.चे सभापती तानेश ताराम, उपसभापती पोमेश्वर रामटेके, जि.प.सदस्य उमाकांत ढेंगे, सुरेखा नाईक, सडक अर्जुनी पं.स.चे उपसभापती दामू नेवारे, पं.स. सदस्य माणिक घनाडे, ख.वि. समितीचे अध्यक्ष नामदेव कापगते, लुणकरण चितलंगे, रघुनाथ लांजेवार व कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना ना. बडोले म्हणाले, ब्रिटीश निघून गेले पण त्यांची जुणी आणेवारीची पद्धत कायम आहे. आणेवारी योग्य झाली नाही. राज्य शासनाने दुष्काळासाठी २ हजार कोटी रुपये जाहीर केले यातील आपल्या वाट्याला अगदी कमी राशी येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीक खरेदीवर बोनस देण्याची पद्धत बंद करुन उत्पादनावर आधारित शेतमालाला भाव देण्यासाठी स्वामीनाथन आयोग गठीत केले. त्याचा अहवाल आल्यानंतर बोनसचा भूलभुलैया उघड होईल. विरोधक केवळ निवडणुकीच्या तोंडावर बोनस जाहीर करतात ही पद्धत बंद करण्यात येईल. शेतकऱ्यांना दर हेक्टरी प्रोत्साहन अनुदान देता येईल काय? हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडला. ही मागणी नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी व श्रावणबाळ योजना येतात. यासाठी २१ हजार रुपये वार्षिक उत्पन्न व ६५ वर्षे वयाची अट आहे. यात बदल करुन ही योजना आणखी कशी चांगली करता येईल या दिशेने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आम अ ादमी योजना ही केवळ ३ लाख लोकांपर्यत पोहोचली आहे. ती २० लाख लोकांपर्यंत पोहोचविता आली असती. ही योजना अधिकाधिक लोकांपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थ्यांसंदर्भात बोलताना ते म्हणाले, ओबीसी प्रवर्गातील एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही. ८०० कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी २२० कोटी रुपये देण्यात आले. येत्या दोन महिन्यात आॅनलाईन पद्धतीने शिष्यवृत्ती प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल. अनुसूचित जातीच्या ५० विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी विदेशात पाठविण्याची योजना आहे. याचा खर्च शासन उचलते. ही योजना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहित नाही. त्यामुळे गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील एकही विद्यार्थी यात सहभागी होत नाही. ही योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)