शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनी व गोंडमोहाडीच्या संघाने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 20:52 IST

बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळत असतानाच येथील प्रौढ कबड्डी स्पर्धेत अर्जुनी येथील तर खो-खो स्पर्धेत गोंडमोहाडी येथील संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

ठळक मुद्देप्रौढ कबड्डी व खो-खो स्पर्धा : १० गावांतील महिलांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतपरसवाडा : बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळत असतानाच येथील प्रौढ कबड्डी स्पर्धेत अर्जुनी येथील तर खो-खो स्पर्धेत गोंडमोहाडी येथील संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान लोक संचालित साधन केंद्रांतर्गत येथील क्रीडांगणावर क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंती निमित्त प्रौढ महिलांच्या क्रीडा मेळाव्यात महिलांनी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले.या महिला मेळाव्यात १० गावांतील सुमारे २०० महिलांनी बचत गटामार्फत भाग घेतला होता. २० ते ५८ वर्षे वयोगटातील महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यातील कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्जुनी येथील संघाने पटकाविला ंअसतानाच द्वितीय क्रमांक खैरलांजी येथील संघाने पटकाविला. खो-खो मध्ये प्रथम क्रमांक गोंडमोहाडी येथील संघाने, द्वितीय क्रमांक पिपरिया येथील संघाने पटकाविला.कदम यांच्या अध्यक्षतेत व सरपंच मनीराम हिंगे, संचालक चतुर्भुज बिसेन, जागेश्वर निमजे, टी.जे. शहारे, हुपराज जमईवार, पोलीस पाटील कुंजीलाल भगत, दिलीप राऊत, प्राचार्य सुभाष रहांगडाले, महेंद्र भगत, चतुर तितिरमारे, सुभाष वैद्ये, जी.आर. ठाकरे यांच्या उपस्थितीत आयोजीत बक्षीस वितरण समारंभात विजेत्या संघांना पुरस्कृत करण्यात आले. प्रास्ताविक अरुण मिश्रा यांनी मांडले. संचालन मंदा पारधी यांनी केले. आभार सुनीता पारधी यांनी मानले. कार्यक्रमासाठी माहिमचे एल.पी. गौतम, संजय कोल्हे, प्रिया पटले, नंदकिशोर रहांगडाले, शिल्पा येळे, मनोज बारेवार आदिंनी सहकार्य केले. पर्यवेक्षक म्हणून चतुर तितिरमारे, महेंद्र भगत, बाळू सोनेवाने, सुभाष वैद्ये, मेश्राम, प्रदीप कडव व सेव्हन स्टार कबड्डी क्रीडा मंडळच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.खेलनबाई उत्कृष्ट कबड्डीपटूउत्कृष्ट महिला कबड्डी पटूचा मान खेलनबाई गेंदलाल पटले (अत्री) यांनी मिळविला. ५८ वर्षे वयातही त्यांनी दाखविलेली फुर्ती व केलेली कामगिरी भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आजच्या पिढीत स्वदेशी खेळांची ओढ निर्माण व्हावी यासाठी या वयात खेळाच्या मैदानात उतरल्याचे त्यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगीतले.