शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

अर्जुनीचा अमन झळकला रूपेरी पडद्यावर

By admin | Updated: October 25, 2015 01:38 IST

झाडीपट्टीत कलावंतांची खाण आहे. दरवर्षी या तालुक्यात शेकडो नाटकांचे सादरीकरण होते.

‘संध्या सावट’ चित्रपट : बालकलाकाराच्या भूमिकेतून रुपेरी दुनियेत ठेवले पाऊलअर्जुनी मोरगाव : झाडीपट्टीत कलावंतांची खाण आहे. दरवर्षी या तालुक्यात शेकडो नाटकांचे सादरीकरण होते. मात्र चंदेरी दुनियेच्या रूपेरी पडद्यावर झळकण्याची संधी अद्याप या तालुक्यातून कोणाच्या वाट्याला आली नाही. मात्र येथील सामान्य कुटुंबातील अमन घनश्याम खरवडे हा बाल कलाकार त्या बाबतीत नशिबवान ठरला. ‘संध्या सावट’ या मराठी चित्रपटात तो झळकला असून गेल्या १६ आॅक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पूर्व विदर्भात झाडीपट्टी नाट्यरंगभूमी प्रसिद्ध आहे. या रंगभूमीवर मुंबई, पुणे येथील अनेक दिग्गज नाट्य कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करतात. पूर्व विदर्भातील झाडीपट्टीला अभिनयाचा वारसा लाभला असला तरी येथील कलावंतांनी रुपेरी पडद्यावर झेप घेतली नाही. नामवंत मराठी कलावंतांना चित्रपटात भूमिका देऊन साकोली तालुक्याच्या लवारी-उमरी येथील मोरेश्वर मेश्राम यांनी ‘द लास्ट बेंचर’, ‘रेला...रे’, ‘३१ डिसेंबर रक्ताविना क्रांती’ हे तर शेखर पटले दिग्दर्शित ‘लाल चुडा’ हे चित्रपट झाडीपट्टीतून तयार झाले. भविष्यात बॉलीवूडची रुपेरी दुनिया ‘झाडीवूड’ या नावाने ओळखली जाणार, असे मत चित्रपट निर्माते मोरेश्वर मेश्राम यांनी व्यक्त केले होते. हळू हळू या निमित्ताने त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. अमन हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तो येथील सरस्वती विद्यालयात सातव्या वर्गात शिकतो. कुटुंबात कुठेही अभिनयाचा वारसा नाही. मात्र अगदी बालपणापासूनच अमनला अभिनयाची आवड आहे. त्याने यापूर्वी काही कार्यक्रमातून उत्कृष्टरित्या अभिनयाचे सादरीकरण केले. त्यातूनच चित्रपट दिग्दर्शक प्रदीपकुमार हाडगे यांचेकडून संध्या सावट या चित्रपटासाठी बाल कलाकार म्हणून अमनला अभिनय करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाच्या कथानकात व्यसनाधिन व दिशाहीन झालेल्या तरुणाईची कौटुंबिक थरारकथा आहे. हा चित्रपट शुक्रवारला लक्ष्मी टॉकीज नागपूर, प्रशांत टॉकीज सिंदेवाही (चंद्रपूर) व महावीर टॉकीज साकोली येथे प्रदर्शित झाला आहे. २३ आॅक्टोबर रोजी हा चित्रपट भंडारा, पवनी, उमरेड, पुणे, अकोला, अमरावती, या ठिकाणी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्राची बहाद्दूरे, विद्या नागरे, प्रज्ञा महल्ले, रजनी मोटघरे, प्रवीण लेदे, प्रदीपकुमार हाडगे, हिटलर भिवगडे, सुनील हिरेकन, सुदीन तांबे, दीपक हरणे, तसेच बाल कलाकार म्हणून अमन खरवडे, खुशी लेदे, अभिजित आरीकर यांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे नागपूर, नवेगावबांध, उमरी लवारी, साकोली, सौंदड, शिवनीबांध व मुंबई येथे चित्रीकरण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)