शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्डातील ३६ टक्के सदस्यांची आधारलिंकिंग

By admin | Updated: September 9, 2015 01:57 IST

आता रेशनकार्डही स्मार्टकार्डमध्ये परिवर्तित केले जाणार असल्याने त्यांना आॅनलाईन करण्याचे काम सध्या सुरू आहे.

उद्दिष्ट १३.६५ लाख नावांचे : वर्षभरापासून केशरी कार्डधारकांना रेशन बंददेवानंद शहारे  गोंदियाआता रेशनकार्डही स्मार्टकार्डमध्ये परिवर्तित केले जाणार असल्याने त्यांना आॅनलाईन करण्याचे काम सध्या सुरू आहे. यांतर्गत रेशनकार्डात नोंद असलेल्या सदस्यांच्या नावांचे आधारलिंकिंग करावयाचे आहे. मात्र अनेकांचे आधार क्रमांक प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत रेशनकार्डांवरील केवळ ३६ टक्केच सदस्यांच्याच नावांची आधारलिंकिग झाल्याची माहिती आहे. असे असतानाही सदर डाटा एंट्रीचे काम राज्यातून दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले आहे.पूर्वी पाच प्रकारचे रेशनकार्ड नागरिकांना त्यांच्या परिस्थितीनुरूप दिले जात होते. यात अंत्योदय, बीपीएल (पिवळे), एपीएल (केशरी), शुभ्र व अन्नपूर्णा (निळा व पोपटी) यांचा समावेश होता. अन्नपूर्णा लाभार्थ्यांना केंद्र शासनामार्फत १० किलो तांदळाचा लाभ मिळत होता. मात्र ही योजनाच आता शासनाने बंद केली. शुभ्रकार्डधारकांना काहीही मिळत नसून ते कार्ड केवळ ओळखपत्राचेच काम करीत आहे. अंत्योदय कार्डधारकांना ३५ किलो धान्य प्रतिकार्ड दिले जाते. यात २५ किलो तांदूळ व १० किलो गव्हाचा समावेश आहे. तर बीपीएल कार्डधारकांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मिळते. यात दोन किलो तांदूळ व तीन किलो गव्हाचा समावेश आहे. तसेच केशरी कार्डधारकांना ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे, त्यांना तांदूळ, गहू व केरोसिनचा लाभ मिळत होता. मात्र वर्षभरापूर्वीच शासनाने केशरी कार्डधारकांना मिळणारा सदर लाभ बंद केला. जिल्ह्यात एकूण सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची संख्या २ लाख ८१ हजार ९७९ एवढी असून त्यात नमूद असलेली सदस्य संख्या १३ लाख ८७ हजार २३९ एवढी आहे. सध्या डिसेंबरपर्यंत १३ लाख ६५ हजार लोकांची नावे आधारलिंकिंग करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र यापैकी आतापर्यंत केवळ चार लाख ९० हजार नावे आधार क्रमांकाशी आॅनलाईन जोडण्यात आली आहेत. यात आतापर्यंत ३६ टक्के डाटा एंट्रीची कामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे. काही नागरिकांकडून त्यांचे आधारकार्ड अद्याप प्राप्त न झाल्यामुळे गावागावांत चावडी वाचन कार्यक्रमातून याबाबत माहिती दिली जात आहे. मात्र मेन डाटा कलेक्शन होऊ न शकल्यामुळे पर्याप्त प्रमाणात नागरिकांचे आधारलिंकिंग होऊ शकले नाही. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत आता अंत्योदय व पीएचएचसध्या केवळ तीनच प्रकारचे रेशन कार्ड सुरू असून त्यात अंत्योदय, पीएचएच (प्रिआॅरिटी हाऊस होल्ड) व एपीएल कार्डांचा समावेश आहे. यापैकी अंत्योदय व पीएचएच धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ दिला जात आहे. बीपीएल कार्डसुद्धा बंद करण्यात आले असून त्यांच्या कार्डवर पीएचएच (प्रिआॅरिटी हाऊस होल्ड) म्हणजे प्राधान्य गटाचे लाभार्थी असा स्टॅम्प लावून लाभ बीपीएलचाच दिला जात आहे. तसेच ग्रामसभा व ग्रामपंचायतने ठरविलेल्या काही एपीएल केशरी कार्डधारकांच्या कार्डवर ‘प्राधान्य गटाचे लाभार्थी’ असा स्टॅम्प लावून प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य दिले जात आहे. यात तीन किलो तांदूळ व दोन किलो गव्हाचा समावेश आहे. पीएचएचमध्ये शहरी भागातून ४५ टक्के व ग्रामीण भागातून ७५ टक्के लोकांचा अंतर्भाव करण्याचे उद्दिष्ट होते.