शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

देवरी-नवेगाव उपसा योजनेला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:35 IST

तालुक्यातील देवरी-नवेगाव उपसा या महत्त्वपूर्ण उपसा सिंचन योजनेला महाराष्ट्र राज्यपाल विद्यासागर राव यांनी अंतिम मंजुरी दिली आहे. यामुळे या परिसतील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मोठी मदत होणार आहे.

ठळक मुद्देराज्यपालांची हिरवी झेंडी : १० हजार हेक्टरला होणार सिंचन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील देवरी-नवेगाव उपसा या महत्त्वपूर्ण उपसा सिंचन योजनेला महाराष्ट्र राज्यपाल विद्यासागर राव यांनी अंतिम मंजुरी दिली आहे. यामुळे या परिसतील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मोठी मदत होणार आहे. आ.गोपालदास अग्रवाल यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन योजनेला राज्यपालांची मंजुरी मिळवून घेतली.शेतकºयांची सिंचनाची समस्या दूर व्हावी, त्यांना दोन्ही हंगामात उत्पन्न घेता यावे, यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी दीडशे कोटी रुपयांच्या देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेला मंजुरी देण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनी शुक्रवारी (दि.२२) रोजी संबंधित विभागाच्या अधिकाºयांची नागपूर येथे बैठक घेतली. या बैठकीत आ.अग्रवाल यांनी राज्यपालांना विनंती केली गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीचे पाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाहुन जाते. याच वाहुन जाण्याऱ्या पाण्याचा उपयोग शेतीच्या सिंचनासाठी केल्यास शेतकºयांना मोठी मदत होईल. देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील २० गावांतील जवळपास १० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सोय होईल. शिवाय १० हजारावर शेतकरी कुटुंबाना याची मदत होणार असल्याची बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ.अग्रवाल यांच्या आग्रहानंतर योजनेचे महत्त्व ओळखत राज्यपाल विद्यासागर राव यांनी देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेला अंतीम मंजुरी दिली. गोंदिया तालुक्यातील काही भाग केवळ बाघ नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे नवीन उपसा सिंचन योजना झाल्यास शेतकऱ्यांना त्याची मोठी मदत होणार होती. हीच बाब ओळखून आ.अग्रवाल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. विशेष म्हणजे मागील पाच ते सहा वर्षाच्या कालावधीत प्रथमच उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी रजेगाव-काटी, तेढवा-सिवणी व डांर्गोली उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळवून दिली. देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिल्याबद्दल राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या उपसा योजनेला मंजुरी मिळाल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.