शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच विषयांना सर्वानुमते मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:43 IST

नगराध्यक्षांंनी बोलाविलेल्या स्थायी समितीच्या सभेत सर्वच विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, सदस्यांचे संख्या बळ जास्त असल्याने असल्याने बाजार वसुली निविदेला विरोधी पक्षातील सदस्यांनी विरोध दर्शविल्यानंतरही त्यांचा विरोध करण्याच्या काहीच उपयोग झाला नाही.

ठळक मुद्दे स्थायी समितीची सभा : विरोधानंतरही बाजार वसुली निविदा पारीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगराध्यक्षांंनी बोलाविलेल्या स्थायी समितीच्या सभेत सर्वच विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, सदस्यांचे संख्या बळ जास्त असल्याने असल्याने बाजार वसुली निविदेला विरोधी पक्षातील सदस्यांनी विरोध दर्शविल्यानंतरही त्यांचा विरोध करण्याच्या काहीच उपयोग झाला नाही.भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन असल्याने स्थगित करण्यात आलेली स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि.१३) घेण्यात आली. १० सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीच्या सभेत नऊ सदस्य हजर होते. यात तीन सदस्य विरोधी पक्षातील असल्याने स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात येणारे सर्वच विषय मंजूर होणार हे सर्वच जाणून होते. त्यानुसार सभेत मांडण्यात आलेले सर्वच विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.विशेष म्हणजे, सर्वच विषयांना मंजुरी असताना बाजार वसुली निविदेच्या विषयाला कॉंग्रेस व आघाडीच्या सदस्यांकडून विरोध होता. त्यानुसार, कॉंग्रेसचे नगर परिषद विरोधी पक्ष नेता व बांधकाम समिती सभापती शकील मंसुरी, नगर परिषद सदस्य सुनील तिवारी व आघाडीकडून स्थायी समितीत आलेले सचिन शेंडे यांनी बाजार वसुली निविदेला विरोध दर्शविला.मात्र सत्ता पक्षातील सदस्यांचे संख्या बळ जास्त असल्याने त्यांचा विरोध करण्याचा काहीच फरक पडला नाही. त्यामुळे सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली.उपाध्यक्षांची सभेला अनुपस्थितीशुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेला उपाध्यक्ष शिव शर्मा यांची अनुपस्थिती होती. आता त्यांच्या अनुपस्थिती मागे नेमके काय कारण होते हे त्यांचे त्यांनाच माहिती. मात्र त्यांच्या अनुपस्थितीला घेऊन नगर परिषद वर्तुळात चांगलेच तर्कवितर्क लावले जात होते. यामागे होणाऱ्या स्फोटाचे संकेत तर नाही ना अशी चर्चाही नगर परिषदेत सुरू होती.विरोधी पक्षाकडे लागले लक्षबाजार वसुलीची निविदा काढण्यात आली तेव्हापासूनच कॉंग्रेस पक्षाकडून याचा विरोध केला जात आहे. एवढेच नव्हे तर, नगर परिषदेतील कॉंग्रेस सदस्य व कॉंग्रेस कमिटी पदाधिकाºयांनी निविदा रद्द करण्याची मागणी करीत जिल्हाधिकारी व आमदारांना निवेदन दिले होते. गरज पडल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतरही स्थायी समितीच्या सभेत बाजार वसुली निविदेला मंजुरी मिळाल्याने आता कॉंग्रेस पक्षाकडून काय पाऊल उचलले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.