शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

सातवा वेतन आयोग विनाअट लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:12 IST

नगर परिषद कर्मचाऱ्यांनाही विना अट सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासह १५ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी व कामगार संघटना संघर्ष समितीच्यावतीने १ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनगर परिषद संघर्ष समिती : आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषद कर्मचाऱ्यांनाही विना अट सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासह १५ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी व कामगार संघटना संघर्ष समितीच्यावतीने १ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतींमधील सर्व कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी, अनुकंपाधारक, पाणी पुरवठा विभाग कर्मचारी, अग्निशमन विभाग, सफाई कामगार, कंत्राटी कामगार व मानधनावरील कर्मचाºयांच्या प्रलंबीत मागण्यांवर शासन स्तरावरून ठोस कार्यवाही होत नाही. त्यात आता शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र यातून नगर परिषद कर्मचाºयांना डावलण्यात आले आहे. नगर परिषद कर्मचाºयांना घेऊन शासनाचा हा दुर्लक्षीतपणा लक्षात घेत नगर परिषद कर्मचाºयांमध्ये रोष व्याप्त आहे. अशात सातवा वेतन आयोग विना अट लागू करून अन्य मागण्यांचीही पूर्तता करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समितीने केली आहे. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समितीने १ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. यासाठी समितीच्यावतीने नगराध्यक्ष व जिल्हाधिकाºयांसह संबंधीतांना निवेदन दिले आहे. समितीच्या न्याय्य मागण्यांना नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी, नगर परिषद कर्मचाºयांच्या मागण्यांची पूर्तता करून त्यांना न्याय देण्यात यावा. या आयशाचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजीक न्याय मंत्री राजकुमार बडोले, लोक लेखा समिती अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांच्यासह संबंधितांना दिले आहे.काळ्या फिती लावून निषेधआपल्या मागण्यांना घेऊन संघर्ष समितीने १ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. मात्र आंदोलनांतर्गत १५ डिसेंबरला राज्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत कार्यालयांसमोर निर्देशन व धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर २९, ३० व ३१ तारखेला कर्मचाºयांनी काळ््या फिती लावून काम केले. येथील नगर परिषदेतील कर्मचाºयांनी सोमवारी (दि.३१) गेट मिटींग घेऊन आंदोलनाबाबत चर्चा केली. तसेच काळ््या फिती लावून काम केले.