शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आशियानासाठी अर्जदारांचे ‘वेट अँड वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:25 IST

आपल्या परिवाराला हक्काचे घर मिळावे यासाठी नगर परिषदेकडे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (शहरी) चार हजार ६६७ अर्ज आले आहेत. यातील दोन घटकांतील काही अर्जदार अपात्र ठरले आहे. योजनेला घेऊन नगर परिषदेकडून प्रक्रिया सुरू आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेकडून प्रक्रिया सुरु : नॅशनल हाऊसिंग बँकेला पाठविली यादी

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्या परिवाराला हक्काचे घर मिळावे यासाठी नगर परिषदेकडे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (शहरी) चार हजार ६६७ अर्ज आले आहेत. यातील दोन घटकांतील काही अर्जदार अपात्र ठरले आहे. योजनेला घेऊन नगर परिषदेकडून प्रक्रिया सुरू आहे. मात्र या योजनंतर्गत अद्याप ठोस कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे लाभार्थी अर्जदारांचे ‘वेट अँड वॉच’ सुरु आहे.सर्वांना हक्काचे घर मिळावे या दृष्टीकोनातून गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन विभागाकडून पंतप्रधान शहरी आवास योजना राबविली जात आहे. चार विविध घटकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत आपल्या हक्काच्या आशियानासाठी नगर परिषदेकडे चार हजार ६६७ अर्ज आले आहेत. चार घटकांतील कोणत्या घटकांत लाभार्थ्याचा समावेश होवू शकतो. त्यानुसार त्यांच्याकडून अर्ज मागवून नगर परिषदेकडून प्रक्रिया सुरू आहे.यात ‘झोपडपट्टी पुनर्विकास’ हे पहिले घटक असून यात ज्यांच्याकडे स्वत:ची जागा नाही तसेच लाभधारक १ जानेवारी २००० किंवा त्यापूर्वीपासून संबंधीत झोपडपट्टीत राहतो. त्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त नाही अशांचा या घटकात समावेश होतो. या घटकातर्गंत त्यांना घरकुल तयार करून द्यावयाचे आहे. या घटकांतर्गत नगर परिषदेकडे १५३८ अर्ज आले आहेत. ‘कर्ज संलग्न व्याज’ हे या योजनेतील दुसरे घटक असून मालकीच्या कच्च्या घराच्या दुरूस्ती किंवा घर बांधणीसाठी सहा लाख रूपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. यावर ६.५ टक्के व्याज हे अनुदान स्वरूपात राहणार आहे. या घटकांतर्गत नगर परिषदेकडे २३४ अर्ज आले असून त्यातील १९५ अर्जदारांची यादी नॅशनल हाऊसिंग बँकेकडे पाठविण्यात आली आहे.‘पब्लीक प्रायवेट पार्टनरशिप’ हे या योजनेतील तिसरे घटक असून यांतर्गत ज्यांच्याकडे जागा व घर नाही तसेच ज्यांचे उत्पन्न वार्षिक तीन लाखांपेक्षा जास्त नसेल अशांचा या घटकात समावेश होत असून यांतर्गत १.५ लाख रूपये अर्थिक मदत दिली जाणार आहे. यांतर्गत ११९७ अर्ज आले असून या घटकांतर्गत नगर परिषदेकडून निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. ‘आर्थिक दुर्बल घटक’ हे या योजनेतील चौथे घटक असून यात ज्यांच्याकडे जागा आहे. पण घर नाही तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त नाही अशांचा या घटकात समावेश होतो. यांतर्गत नगर परिषदेकडे १७६७ अर्ज आले असून त्यातील ५१५ अर्ज पत्र ठरले आहेत. या चारही घटकांतर्गत नगर परिषदेकडून प्रक्रिया केली जात असल्याची माहिती आहे. मात्र शासनाकडून निर्देश मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे मात्र पंतप्रधान आवास योजनेंतर्गत हक्काच्या आशियानाचे स्वप्न बघणाऱ्यांना मात्र तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.शहर होणार झोपडपट्टी मुक्तयोजनेतील झोपडीपट्टी पुनर्विकास घटकांतर्गत नगर परिषदेकडून १५३८ अर्ज आले आहेत.यावरून शहरातील झोपडपट्टींची समस्या जाणून घेता येते. मात्र योजनेंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकास झाल्यास नक्कीच शहरातील झोपडपट्यांच्या जागेवर पक्की घरे तयार होणार. असे झाल्यास शहर झोपडपट्टी मुक्त होणार यात शंका नाही.