शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एओपीतील प्रशिक्षण; १२१ मुले नोकरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:02 IST

शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहणारे आदिवासी नक्षलवाद्यांना जेऊ घालत होते. मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना पोलीस विभागाव्यतिरिक्त शासनाचा कोणताही विभाग प्रवृत्त करीत नव्हता.

ठळक मुद्देपुण्यातील पुस्तके एओपीत : नक्षलग्रस्त भागातील २०६५ आदिवासी मुला-मुलींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहणारे आदिवासी नक्षलवाद्यांना जेऊ घालत होते. मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना पोलीस विभागाव्यतिरिक्त शासनाचा कोणताही विभाग प्रवृत्त करीत नव्हता. त्यामुळे नक्षलवाद्यांना आदिवासींनी जेवण देणे ही बाब त्यांची नित्याचीच होती. गोंदिया पोलिसांनी या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देत त्यांच्या मुलांना शासकीय नोकरीत येण्याची संधी प्राप्त करुन दिली. गोंदिया जिल्हा पोलिसांच्या प्रेरणेने सात वर्षात आदिवासींचे १२१ मुले-मुली शासकीय नोकरीत लागले आहेत.गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. ज्या गावात शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. रोजगाराचे साधन उपलब्ध नाही, शेतीवरच अवलंबून असलेल्या आदिवासींना जंगलातून मिळणाºया उत्पन्नावरच अवलंबून रहावे लागत असे. आयुष्य दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासींना आयुष्य संपूनही कसलाही आधार मिळत नव्हता. त्यामुळे आदिवासी पोलिसांना मदत न करता नक्षलवाद्यांना जेवण देत होते. परंतु स्व.आर.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेमुळे आदिवासींचे मन पोलिसांसोबत जुळविण्यास सुरूवात झाली. पोलीस व आदिवासी जनता यांच्यात समन्वय साधणारा दुवा म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने काम केले. या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. आदिवासी व नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील असलेल्या गावांमध्ये पोलीस जाऊ लागले. पोलिसांनी आदिवासींचे दु:ख जाणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आधार कार्ड बनवून देणे, रेशन कार्ड बनवून देणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना अशा विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. पोलीस इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी आदिवासींच्या मुलांना नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांच्यासाठी भरती पूर्व पोलीस प्रशिक्षण सुरु केले. सन २०१० पासून आतापर्यंत २०६५ आदिवासी मुला-मुलींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात आले. यात १२१ मुला-मुलींना पोलीस, सैन्य व होमगार्ड या ठिकणी नोकरी मिळविता आली.शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत आदिवासी मुले-मुली कुठेही मागे पडू नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी जातीने लक्ष घालून लाखो रुपयांची पुस्तके खरेदी करुन एओपीमध्ये ठेवली आहेत. त्याचा लाभ आदिवासी परिसरातील तरुण-तरुणी घेत आहेत.केशोरी पोलिसांनी प्रशिक्षण वर्ग घेतल्याने ४ जणांना नोकरी मिळाली. चिचगड पोलिसांनी २०१० मध्ये ४९ जणांना, २०१४ मध्ये १०२ जणांना, २०१५ मध्ये ८ जणांना प्रशिक्षण दिले. त्यातील ११ जण नोकरीला लागले. डुग्गीपार पोलिसांनी २०१५ मध्ये ५० जणांना प्रशिक्षण दिले. त्यातील १२ जण होमगार्ड मध्ये लागले. गोंदिया पोलिसांच्या मेहनतीमुळे आदिवासी मुले नोकरीसाठी प्रयत्न करू लागले. पोलिस विभागाने सुरू केलेल्या या भरती पूर्व प्रक्षिणाचा पुरेपूर फायदा आदिवासींनी घेतला.आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व विभागांना एकत्रित करुन त्यांच्या सभा घेतल्या. या तरुणांना स्पर्धेच्या युगात टिकता यावे यासाठी लाखो रुपयाची पुस्तके पुणे येथून खरेदी करुन एओपीमध्ये ठेवले आहेत. त्याचा लाभ पोलीस पूर्व भरती प्रशिक्षणासाठी तयारी करणारे मुले घेत आहेत.-डॉ.दिलीप पाटील भुजबळपोलीस अधीक्षक, गोंदिया