शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 21:35 IST

Gondia News सध्या रब्बी धान पिकाची कापणी व मळणी सुरू आहे. मात्र या महिन्याच्या सुरुवातीपासूनच दररोज अर्जुनी-मोरगाव तालुक्यात कुठे ना कुठे विजांच्या कडकडाटासह वादळ वारा व पाऊस हजेरी लावत असल्याने धान उत्पादक शेतकरी चिंतित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

गोंदिया : अर्जुनी-मोर तालुक्यात इटीयाडोह धरणाच्या सिंचनाने रब्बी हंगामात पिकाचे उत्पादन घेतले जाते. रब्बी धान पिकाची लागवड जानेवारी महिन्यात केली जाते, तर त्याचे उत्पादन मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात येते. सध्या रब्बी धान पिकाची कापणी व मळणी सुरू आहे. मात्र या महिन्याच्या सुरुवातीपासूनच दररोज अर्जुनी-मोरगाव तालुक्यात कुठे ना कुठे विजांच्या कडकडाटासह वादळ वारा व पाऊस हजेरी लावत असल्याने धान उत्पादक शेतकरी चिंतित आहे.

मागील तीन चार दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात मोठ्या डौलाने धान पीक बहरलेले आहे. वादळी वारा व पाऊस यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतातील धान पीक आडवे पडलेले आहे. लोंबीवरील धानाचे लोंब आहेत. त्यामुळेसुद्धा उत्पादन कमी होत आहे तसेच कापणी झालेल्या धानावर अवकाळी पावसामुळे कडपा पुन्हा वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

माझ्या शेतात रब्बी हंगामात धान पिकांची लागवड केली आहे. यावर्षी कीटकनाशकांचा खर्च कमी आलेला असून, पीक समाधानकारक होते. मात्र मागील तीन चार दिवसांपासून अवकाळी पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता बळावली आहे.

- श्रीराम भावे शेतकरी, इसापूर

अर्जुनी-मोरगाव तालुक्यात रब्बी हंगामात सर्वत्र धान पिकाची लागवड केली आहे. यंदा रब्बी धानाचे पीकसुध्दा चांगले आहे. मात्र अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हाती आलेले पीक वाया जाण्याची शक्यता आहे.

- केवल शेंडे, शेतकरी, इसापूर

टॅग्स :agricultureशेती