शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

खोट्यांना तोडीस तोड उत्तर द्या

By admin | Updated: August 10, 2016 00:11 IST

गेल्या दोन वर्षात केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचे खरे रूप नागरिकांनी पाहीले आहे.

नितीन राऊत : काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात केले आवाहन

गोंदिया : गेल्या दोन वर्षात केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचे खरे रूप नागरिकांनी पाहीले आहे. प्रत्येक बाबतीत हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.नितीन राऊत यांनी केले. क्रांती दिवसाचे औचित्य साधून येथील प्रताप लॉनमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून आ.गोपालदास अग्रवाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे, तिरोडा विधानसभा प्रभारी उमाकांत अग्निहोत्री, आमगाव विभानसभा प्रभारी माजी आ.पेंटाराम तलांडी आदी होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.राऊत म्हणाले, देशाचे पंतप्रधान आज ज्या आधुनिक टेक्नॉलॉजीचा दुनियेत गौरव करीत फिरत आहे ती टेक्नॉलॉजी माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची देण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा गौरवशाली वाटा आहे. ज्या देशात स्वातंत्र्यानंतर सुई बनविण्याचा कारखानाही नव्हता त्या देशाला काँग्रेसच्या नेतृत्वात सशक्त बनविले. स्व.इंदिरा गांधींच्या नेतृत्वात पोखरण येथे अनुचाचणी करण्यात आली. सोनिया गांधींच्या नेतृत्वात १० वर्षे राज्य करताना पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आर्थिक उदारीकरणाची दारे उघडली. यातूनच अनेक क्रांतीकारी योजना सुरू झाल्या. मात्र आजचे सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य आधारभूत किंमत देण्यातही यशस्वी झाले नाही. महागाई थांबविण्याचे आश्वासन देणाऱ्यांच्या काळात महागाई अजून वाढतच असून हे सरकार केवळ खोटी आश्वासनेच देऊ शकतात, अशी टीका डॉ.राऊत यांनी केली. आ.गोपालदास अग्रवाल म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्राचा सर्वांगिन विकास ही माझी प्राथमिकता आहे. राजकारणात उच्च आदर्श ठेवत आपण कधीही विकास कामात पक्षपातीपणा केला नाही. २००४ पासून आजपर्यंत गोंदिया विधानसभेचे नेतृत्व करताना काँग्रेसला मजबूत करण्याचे काम केले. आज क्रांती दिवसाच्या पर्वावर येणाऱ्या आव्हानांचा सामना पूर्ण ताकदीनिशी करून गोंदिया नगर परिषद तसेच इतर स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी इतर पाहुण्यांसह माजी मंत्री भरत बहेकार, माजी जि.प.अध्यक्ष अ‍ॅड.के.आर.शेंडे, टोलसिंहभाऊ पवार, रजनी नागपुरे, प्रदेश काँग्रेसचे सचिव विनोद जैन, डॉ.योगेंद्र भगत, जिल्हा परिषद सभापती पी.जी.कटरे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा सहारे, जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष पन्नालाल सहारे, जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहेसराव कोरोटे, अनिल गौतम यांनीही मार्गदर्शन केले. सर्व कार्यकर्त्यांनी देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांपासून प्रेरणा घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मजबूत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा काँग्रेसचे महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी तर आभार प्रदर्शन माजी आ.रामरतन राऊत यांनी केले. यावेळी सर्व अतिथींनी वरिष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी व माजी मंत्री केवलचंद जैन यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गोरेगाव नगर पंचायतचे उपाध्यक्ष आशिष बारेवार, न.पं.सदस्य चंद्ररेखा कांबळे, सातगावचे उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, भडंगाचे उपसरपंच वामन नंदेश्वर, गोरेगाव नगर पंचायत चे सभापती राजू टेंभुर्णीकर, सदस्य श्यामली जैसवाल, तसेच नागेश दुबे, राजेश कापसे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाला जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, एनएसयुआयचे जिल्हा अध्यक्ष संदीप रहांगडाले, सभापती स्रेहा गौतम, हेमलता डोये, पौर्णिमा शहारे,सीमा कटरे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)