शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

आणखी एका गर्भवतीचा मृत्यू

By admin | Updated: May 20, 2017 01:49 IST

गोंदिया जिल्हा बालमृत्यू व मातामृत्यूने धगधगत आहे. आठवड्याभरात तीन गर्भवतींचा मृत्यू झाला आहे.

आठवड्याभरात तीन गर्भवतींचा मृत्यू : गंगाबाईत अडीच तास थांबूनही उपचार नाही गोंदिया : गोंदिया जिल्हा बालमृत्यू व मातामृत्यूने धगधगत आहे. आठवड्याभरात तीन गर्भवतींचा मृत्यू झाला आहे. दवनीवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नवेगाव उपकेंद्रातील मुसनीटोला येथील एका गर्भवतीचा आज (दि.१९) पहाटे १.३० वाजता जिल्ह्यात उपचार न झाल्याने उपचारासाठी नागपूरला जाताना रस्त्यातच मृत्यू झाला. चंद्रकला अनिल बनोटे रा. मुसनीटोला असे मृत महिलेचे नाव आहे. ती दुसऱ्यावेळी प्रसुतीसाठी गुरुवारी उपकेंद्र नवेगाव येथे तिच्या बाळाला ठोके येत होते. तेथील परिचारीकेने प्रसुतीसाठी चंद्रकलाला बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तिला रात्री ११ वाजता बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात आणले. परंतु येथील डॉक्टरांनी तिची प्रसुती न करता टाळाटाळ केली. रात्री ११ वाजता आलेल्या गर्भवतीची प्रसुती व्हावी यासाठी कसलेही प्रयत्न न करता रात्री दीड वाजता तिची प्रकृती नाजूक सांगून नागपूरला रेफर करण्यात आले. गंगाबाईमधील १०८ या रुग्ण वाहिकेने नागपूरला रवाना करण्यात आले. सदर महिलेची गर्भपिशवी फाटल्यामुळे ती शॉकमध्ये गेली परिणामी तिला रेफर करण्यात आल्याचे गंगाबाईतील डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र गर्भवती महिलेची प्रसुती झालीच नाही तर तिची गर्भपिशवी फाटली हे डॉक्टरांना कसे समजले हा ही प्रश्न विचार करायला भाग पाडतो. रात्री ११ वाजता आलेल्या गर्भवतीवर तब्बल अडीच तास वाया घालवूनही उपचार होत नाही. अखेर तिची प्रसुती न करता गर्भाची पिशवी फाटल्याचे कारण सांगून नागपूरला रवाना करण्यात आले. गोंदिया ते नागपूर हे अंतर कापण्यासाठी तब्बल चार तास लागतात. या वेळात त्या गर्भवतीचा मृत्यू होऊ शकतो हे डॉक्टरांना माहित असताना डॉक्टरांनी तिच्यावर उपचार न करता कोणत्या आधारावर रेफर केले. गर्भाची पिशवी फाटली तर शस्त्रक्रियेनंतर गर्भाची पिशवी काढून टाकली असता रुग्ण महिलेचा जीव वाचला असता. परंतु डॉक्टरांनी याकडे लक्ष न देता सरसकट तिला रेफर केले. गोंदियावरुन निघालेल्या चंद्रकलाचा पहाटे १.३० वाजता रस्त्यातच मृत्यू झाला. परिणामी नातेवाईकांनी तिला घरी नेले. या आठवड्यात तीन गर्भवतींचा मृत्यू झाला आहे. एका चुकीमुळे बाळाचाही मृत्यू गर्भाची पिशवी फाटली असे गंगाबाईतील डॉक्टरांचे म्हणणे होते. तर ती पिशवी काढून त्या महिलेचा जीव वाचविता आला असता. तिला नागपूरला नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यावेळी वेळीच शस्त्रक्रिया करुन बाळाला वाचविता आले असते. परंतु यासंदर्भात गोंदियातील डॉक्टरांनी पाऊल उचलले नाही किंवा १०८ वर असलेल्या डॉक्टरांनी सल्ला दिला नाही. गंगाबाईतील डॉक्टरांच्या चुकीमुळे या महिलेचा मृत्यू झाल्याची ओरड आहे. डॉक्टर बिनधास्त दवनीवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नवेगाव उपकेंद्र आहे. या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या मुसलीटोला येथील चंद्रकला अनिल बनोटे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. तरी देखील या संदर्भात दवनीवाडा येथील डॉक्टर खरबडे संवेदनशील दिसून आले नाही. या घटनेची माहिती घेण्यासाठी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चांदेकर यांनी त्यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. अनेकदा फोन करुनही उत्तर न मिळाल्याने दुसऱ्याच्या मोबाईलवरुन फोन केला असता तो फोन त्यांनी रिसिव्ह केला. फोन न उचलण्याचे कारण विचारले असता मी झोपला होतो असे त्यांनी सांगितले. त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गर्भवती महिलेचा मृत्यू होतो आणि ते झोपा काढतात ही बाब त्यांच्या कार्यावर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी आहे.