शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १०३ बालके मुख्य प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:49 IST

जी मुले अजूनही शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आली नाहीत किंवा जी बालके स्तलांतरीत होतात. अशा बालकांचे सर्वेक्षण बालरक्षकांच्या माध्यमातून करण्यात आले. सन २०१८-१९ मध्ये शाळाबाह्य बालकांचे २३ ते २७ नोव्हेंबर या दरम्यान अंतिम सर्वेक्षण करण्यात आले. यात ७७ बालके व सर्वेक्षणानंतर २६ बालके शाळाबाह्य असल्याचे उघडकीस आले आहे. या १०३ बालकांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यात आले.

ठळक मुद्देसर्वेक्षणानंतर २६ बालके आढळली शाळाबाह्य : २४ बालकांनी शाळेचे दर्शनच घेतले नाही

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जी मुले अजूनही शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आली नाहीत किंवा जी बालके स्तलांतरीत होतात. अशा बालकांचे सर्वेक्षण बालरक्षकांच्या माध्यमातून करण्यात आले. सन २०१८-१९ मध्ये शाळाबाह्य बालकांचे २३ ते २७ नोव्हेंबर या दरम्यान अंतिम सर्वेक्षण करण्यात आले. यात ७७ बालके व सर्वेक्षणानंतर २६ बालके शाळाबाह्य असल्याचे उघडकीस आले आहे. या १०३ बालकांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यात आले.सन २०१८-१९ मध्ये शाळाबाह्य बालकांचे २३ ते २७ नोव्हेंबर या पाच दिवसात अंतीम सर्वेक्षणात बालरक्षकांनी घरोघरी भेटी दिल्यात. बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, बाजार इत्यादी ठिकाणी फिरून तळागाळातील, झोपडपट्टीत राहणारी खेडे, गाव, वाडी, पाडे, तांडे, वस्ती, शेतमळे, जंगलात वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात व त्यानंतर आढळलेल्या बालकांची संख्या गोंदिया तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ४६ बालके आढळलीत.तिरोडा तालुक्यात १६ बालके, आमगाव तालुक्यात ११ बालके, सडक-अर्जुनी ७ बालके, सालेकसा ११ बालके, अर्जुनी-मोरगाव २, गोरेगाव तालुक्यात १० बालके अशी १०३ बालके शाळाबाह्य आढळली आहेत. ९ जानेवारी २०१७ अन्वये बालरक्षक ही संकल्पना पुढे आणली.जिल्ह्यात समता लिंक पुणे व जिल्ह्याच्या लिंकमध्ये ४५८ बालरक्षकांची नोंदणी केली आहे. एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही याची दखल घेण्यात आली. सर्वेक्षणानंतर एकही विद्यार्थी शाळाबाह्य आढळला तर त्याची जबाबदारी शिक्षक केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची राहील, असा इशाराही देण्यात आला होता.त्यामुळे बालरक्षकांनी व इतर शिक्षकांनी उत्तम कामगीरी करून शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आले. शिक्षण विभागाने केलेल्या अंतीम सर्वेक्षणात उत्तम कामगीरी केली.पाच दिवस केलेल्या सर्वेक्षणात पकडलेल्या ७७ बालकांपैकी २४ बालके अशी आढळली की ते कधीच शाळेत गेले नव्हते. त्यात १७ मुले व ७ मुलींचा समावेश आहे.अशी आमगाव तालुक्यात २, गोंदिया १८ व सालेकसात चार बालके आढळली.देवरीत एकही आढळले नाही शाळाबाह्य मुलेशासन निर्णय २० मे २०१५ अन्वये ६ ते १८ वर्ष वयोगटातील शाळेत न जाणारी व सतत ३० दिवसापेक्षा अधिक गैरहजर राहणाºया बालकांचे सर्वेक्षण करण्यात येते. दरवर्षी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला जातो. सर्वेक्षणाची कार्यपध्दती योग्यरित्या करण्यासाठी तालुका व गावपातळीवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी व बालरक्षकांनी केलेले अंतीम सर्वेक्षण व त्यानंतरही मिळालेल्या शाळाबाह्य मुलांच्या संख्येत देवरी तालुक्यात एकही बालक शाळाबाह्य आढळला नाही विशेष.