शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:25 IST

यंदा पावसाने दगा दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला असून कर्जबाजारी शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या खाईमध्ये उभा आहे. असे असताना पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होणार तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देयंदा पावसाने दगा दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला असून कर्जबाजारी शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या खाईमध्ये उभा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी/डाकराम : यंदा पावसाने दगा दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला असून कर्जबाजारी शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या खाईमध्ये उभा आहे. असे असताना पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होणार तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तिरोडा तालुक्यातील खडकी-डोंगरगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या आमसभेत एकमुखाने तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, असा ठराव घेण्यात आला.सदर ठरावाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री व विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविण्यात आले. तसेच सहकारी आयुक्त व जिल्हाधिकारी गोंदिया यांना सुध्दा प्रती पाठविण्यात आल्या आहेत.खडकी-डोंगरगाव येथील सेवा सहकारी सोसायटीची आमसभा पार पडली. अध्यक्षस्थानी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शिशुपाल पटले होते. अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाचे सभापती डॉ. चिंतामन रहागडाले, माजी सभापती वाय.टी. कटरे, सेवा सहकारी सुकडीचे अध्यक्ष विलास मेश्राम, तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष एच.डी. जांभूळकर, छबीलाल पटले, पारस पटले, कटरे, तेजराम चव्हाण, जयप्रकाश खोब्रागडे, खोब्रागडे, रमेश कटरे, यादोराव कटरे, बुधन पटले, मोहनलाल कटरे, जगदिश मुखेर, अरुण पटले, महादेव रहांगडाले, पप्पू कटरे, प्रकाश कटरे, शीला टेंभरे, लाला गजभिये, बंसोड, सर्व शेतकरी व गावकरी उपस्थित होते.या वेळी सर्व शेतकºयांना कृषी बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले यांच्या हस्ते स्टील कटोरी वाटप करुन सत्कार करण्यात आला. आमसभेचे कार्यवृत्तांत सचिव जयप्रकाश खोब्रागडे यांनी सादर केले. प्रास्ताविक साहेबराव बंसोड यांनी मांडले. संचालन रविंद्र बंसोड यांनी केले. आभार लाला गजभिये यांनी मानले. कार्यक्रमासाठी खडकी-डोंगरगाव येथील शेतकरी व तरूणांनी सहकार्य केले.