शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसने उतरविले गौतमनगरचे भूत

By admin | Updated: July 5, 2015 01:57 IST

एक जिन्न मोकाट सुटला असून तोच बकऱ्या व कोंबड्यांना मारत असल्याची अफवा शहरातील गौतमनगर परिसरात सध्या चांगलीच पसरली आहे.

अफवेने दहशत : बकऱ्या व कोंबड्या मारल्या, समाजकंटकाचे कृत्यगोंदिया : एक जिन्न मोकाट सुटला असून तोच बकऱ्या व कोंबड्यांना मारत असल्याची अफवा शहरातील गौतमनगर परिसरात सध्या चांगलीच पसरली आहे. या प्रकारामुळे मात्र परिसरातील नागरिकांना घराबाहेर निघणे सोडले आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या प्रकाराची शक्यता फेटाळून लावली असून नागरिकांची समजूत घातली आहे. शहरातील गौतम नगर परिसरात मागील काही दिवसांपासून बकऱ्या व कोंबड्यांची गळा दाबून हत्या केली जात असल्याचे सत्र सुरू आहे. यातच काही दिवसांपूर्वी परिसरातील प्रेम कुल्फीवाल यांच्या पाच बकऱ्या व आठ कोंबड्या मारण्यात आल्या. विशेष म्हणजे त्यांना गळा दाबून मारण्यात आल्याने जिन्न सुटला असून तोच त्यांचे रक्त प्राशन करून मारत असल्याची अफवा परिसरात पसरली आहे. जिन्नच्या भितीमुळे गौतमनगरवासीयांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले. एवढेत नव्हे तर मोठ्यांनीही अंधार पडल्यावर घराबाहेर निघणे बंद केले आहे. तर अनेकांची प्रकृती दहशतीमुळे खराब होत असल्याचेही प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे काहींनी तर रात्री दोन -तीन वाजताच्या सुमारास शैतानाने घराचा दरवाजा ठोकल्याचेही नागरिकांकडून बोलले जात आहे. (शहर प्रतिनिधी) अनिसच्या कार्यकर्त्यांनी दिली भेट जिन्नची अफवा पसरवून गौतमनगरात सुरू असलेल्या या प्रकाराचा पर्दाफाश करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे, सदस्य अंकेश शहारे, प्रभाकर वऱ्हाडे , संजय यादव, पप्पू वासनीक यांनी परिसरात जाऊन नागरिकांची भेट घेतली. घडलेल्या प्रकाराची पाहणी करून कार्यकर्त्यांनी जिन्नचा प्रकार फेटाळून लावला. तर हे कृत्य एखाद्या समाजकंटकाकडून केले जात असल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांना निर्भयपणे राहण्यास सांगीतले असून भितीदायक प्रकार घडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.