शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त पालकांनी शाळेचे कुलूप उघडू दिले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 21:32 IST

शिक्षण विभागाकडे वांरवार शिक्षकाचे रिक्त पद भरण्याची मागणी करुन सुध्दा शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. याप्रकारामुळे संतप्त झालेल्या मोहगाव-तिल्ली येथील पालकांनी आज (दि.२८) सकाळी जि.प.शाळेला लागलेले कुलूप उघडू दिले नाही. तर विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या प्रवेशव्दारावर ठाण मांडले होते.

ठळक मुद्देमोहगाव तिल्ली शाळा : सहा महिन्यांपासून शिक्षकाचे पद रिक्त, आंदोलन तीव्र करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शिक्षण विभागाकडे वांरवार शिक्षकाचे रिक्त पद भरण्याची मागणी करुन सुध्दा शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. याप्रकारामुळे संतप्त झालेल्या मोहगाव-तिल्ली येथील पालकांनी आज (दि.२८) सकाळी जि.प.शाळेला लागलेले कुलूप उघडू दिले नाही. तर विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या प्रवेशव्दारावर ठाण मांडले होते.मोहगाव-तिल्ली येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत सध्या सहा शिक्षक कार्यरत आहेत. शाळेत पदवीधर व उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे. मागील सहा महिन्यांपासून पद रिक्त असताना प्रभारी मुख्याध्यापक एच.के.धपाडे यांची बदली करण्यात आली.प्रभारी मुख्याध्यापकाच्या बदली प्रकरणाने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्याना बसवून शाळा उघडू देणार नाही असा पवित्रा घेतला. आधी रिक्त पदे भरा नंतरच शिक्षकांची बदली करा अशी मागणी लावून धरली. जोपर्यंत बदली आदेश रद्द होणार नाही व सहा महिन्यांपासून रिक्त असलेले शिक्षकांचे पद भरले जाणार नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडू देणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे.शिक्षण विभाग एकीकडे जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा सामोर आला आहे.सरपंच अल्का पाथोडे, उपसरपंच दिगंबर कटरे, रेवालाल गौतम, सुकचारी रहांगडाले, लोकराम बोपचे, चुन्नीलाल गौतम, यादोराव बोपचे, विनोद पटले, खिलेश्वर बोपचे, ज्योती जगनित, मालीक गौतम, ब्रिजलाल पटले व गावकºयांनी शाळेच्या प्रवेशव्दारासमोरच ठाण मांडले होते. शिक्षण विभाग यासंदर्भात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.