शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ती छोट्याशा खोलीत भरविते अंगणवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:21 IST

येथील नगर पंचायत अंतर्गत रामजीटोला येथील अंगणवाडीची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.मात्र प्रशासनाने अद्यापही याची दखल न घेतल्याने अंगणवाडी सेविकेने चिमुकल्यांचे नुकसान होवू नये यासाठी स्वत:च्या आठ बाय सहाच्या खोलीत अंगणवाडी सुरू केली.

ठळक मुद्देअंगणवाडीची इमारत जीर्ण : प्रशासनाची बघ्याची भूमिका

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : येथील नगर पंचायत अंतर्गत रामजीटोला येथील अंगणवाडीची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.मात्र प्रशासनाने अद्यापही याची दखल न घेतल्याने अंगणवाडी सेविकेने चिमुकल्यांचे नुकसान होवू नये यासाठी स्वत:च्या आठ बाय सहाच्या खोलीत अंगणवाडी सुरू केली.मागील तीन वर्षांपासून ती या छोट्याशा खोलीत अंगणवाडी चालवित आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने याची दखल घेतली नाही.नगर पंचायत सालेकसा अंतर्गत रामजीटोला येथे मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडी केंद्र सुरु आहे. सध्यास्थितीत तीन ते सहा वर्ष वयोगटातील २८ मुले-मुली अंगणवाडीत शिकायला आहेत. उर्मिला भागवत लिल्हारे या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या वतीने अंगणवाडी केंद्रासाठी इमारत उभारण्यात आली. मात्र आता ही इमारत पूर्णपणे जीर्ण व धोकादायक झाली आहे. इमारतीच्या छत सुध्दा जीर्ण झाले आहे. तर पावसाळ्यात इमारतील गळती लागते. भिंतीचे प्लास्टर सुध्दा पडत असल्याने या इमारतीत अंगणवाडीच्या चिमुकल्यांना शिकविणे म्हणजे धोका होता. जीर्ण इमारत व चिमुकल्यांचा जीवाचा विचार करुन उर्मिला शहारे यांनी आपल्या स्वत:च्या घरी छोट्याशा खोलीत अंगणवाडी भरविण्यास सुरूवात केली.मागील तीन वर्षांपासून ते या इमारतीत चिमुकल्यांवर संस्कार करीत आहेत. अंगणवाडीच्या जीर्ण इमारतीची माहिती पर्यवेक्षक व अंगणवाडी सेविकेने अनेकदा बालविकास प्रकल्प कार्यालयाला दिली. मात्र तीन वर्षांच्या कालावधी लोटूनही याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी अंगणवाडी सेविकेला आपल्या छोट्याशा खोलीत अंगणवाडी चालवावी लागत आहे. यासाठी त्यांना विविध अडचणींना सुध्दा तोंड द्यावे लागत आहे. मात्र त्यांनी आपले कार्य थांबविले नाही. काहीही झाले तरी चिमुकल्यांचे नुकसान होवू देणार नाही असा संकल्पच उर्मिला लिल्हारे यांनी केला आहे.रामजीटोला येथे अंगणवाडी केंद्र क्रं.११० साठी इमारत नसल्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. पण अद्यापही त्याला मंजुरी मिळाली नाही.- एस.एन. बोपचेविस्तार अधिकारी, सालेकसा.ही अंगणवाडी अद्यापही नगर पंचायतकडे हस्तांतरीत करण्यात आली नाही. त्यामुळे अंगणवाडी इमारत बांधकामाचा प्रस्ताव घेता येत नाही.- उमेदलाल जैतवारबांधकाम सभापती न.प.सालेकसा