शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अन् आरक्षण सोडत अखेर निघालीच नाही

By admin | Updated: July 3, 2015 01:59 IST

तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत गुरुवारला (२) जाहीर होणार होती.

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत गुरुवारला (२) जाहीर होणार होती. मात्र तालुका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही सोडत रद्द करण्यात आली. शुक्रवारला (३) दुपारी १२ वाजता ही आरक्षण सोडत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काढण्यात येणार आहे.प्राप्त माहितीनुसार, राज्य निवडणुक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील आठही तालुक्यातील मुदत संपलेल्या १८२ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली. २५ जुलै रोजी होणाऱ्या ग्रा.पं. निवडणुकीसाठी आज (दि.२) सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार होती. तालुक्याच्या ७० ग्रामपंचायतसाठी सन २०१५ ते २०२० या कालावधीकरिता आरक्षण सोडतीचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात काढले जाणार होते. या सोडतीसाठी बाहेर गावावरुन बरेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच व सदस्य दुपारी १२ वाजेपासून आले होते. नियोजित ठिकाणी तहसीलदार रहांगडाले दुपारी २ वाजता आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह हजर झाले. बराच वेळ त्यांनी नुसती कागदपत्रांची जमवाजमव केली. उपस्थित जनसमूदाय अक्षरश: कंटाळला होता. ३.१५ वाजता अनु.जाती प्रवर्गातील आरक्षित ग्रा.पं.ची नावे घेतली. यावेळी येरंडी या गावाचा एकेरी नामोल्लेख केला. या तालुक्यात एकूण ५ येरंडी नावाची गावे आहेत. कोणती येरंडी हा प्रश्न जनसमुदायाने उपस्थित करताच तहसीलदार भांबावले. त्यांनी पुन्हा कागदपत्राची शहनिशा केली. शेवटी येरंडी/देवलगाव हे गाव घोषित केले. अनु. जाती प्रवर्गातील १२ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची नावे घोषित केली जाणार होती. मात्र १० नावांवरच तहसीलदार थबकले. वारंवार होणाऱ्या चुकीच्या उद्घोषणेमुळे लोकं चिडले. शेवटी तहसीलदारांनी ही आरक्षण सोडत उद्या (दि.३) दुपारी १२ वाजता घोषित होणार असल्याची उद्घोषणा केली. तालुका प्रशासनाच्या अशा ढिसाळ नियोजनामुळे लोकांचा वेळ वाया गेला. (तालुका प्रतिनिधी)