शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्याने नऊ तास झाडावर काढले

By admin | Updated: September 14, 2016 00:20 IST

सलग दोन दिवस तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला.

पुराचा फटका : काळ आला होता, पण वेळ नाहीसालेकसा : सलग दोन दिवस तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला. यादरम्यान सालेकसा येथील भरत फुंडे या शेतकऱ्याला शेंढा नाल्यात आलेल्या पुराने जीवन-मरणाच्या खेळात अडकून पडावे लागले. सकाळपासून सायंकाळपर्यंत सतत नऊ तास फुंडे यांनी आंब्याच्या झाडावर उपाशीपोटी काढले. सुदैवाने सायंकाळी त्यांना जीवनदान मिळाले. युवकांनी फुंडे यांना दोरीच्या सहाय्याने पुरातून सुखरुप बाहेर काढून घरी पोहोचण्यास मदत केली. त्यामुळे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, या म्हणीची प्रचिती अनेकांनी घेतली. आमगाव खुर्द (सालेकसा) येथील ६० वर्षीय शेतकरी भरत फुंडे यांचे शेत हाजराफॉल परिसरातून निघणाऱ्या रोंढा नाल्याच्या किनाऱ्यालगत आहे. पावसाने दडी मारल्यामुळे फुंडे यांनी विद्युत पंप लावून शेतीला पाणी देणे सुरू केले होते. दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावल्याने नाल्यावर लावलेला पंप काढून घेण्यासाठी ते सकाळी ७ वाजता सुमारास आपला मुलगा अजय फुंडे (२३) यांच्यासोबत सायकलने शेतात गेले. पाण्याचा पंप काढत असतानाच नाल्याच्या पाण्याची पातळी वाढत गेली. हे पाहून त्यांचा मुलगा नाल्याच्या पलीकडे सायकल घेऊन बाहेर निघाला. वडीलसुद्धा आता बाहेर निघतील म्हणून वाट राहीला. परंतु बघता-बघात रोंढा नाल्याला जबदस्त पुराचा लोंढा आला आणि शेतासह संपूर्ण परिसर पुराच्या तडाख्यात सापडले. फुंडे यांनी ‘मरता, क्या न करता’ याप्रमाणे हिमत लावून शेतातील आंब्याच्या झाडावर चढून राहण्यासाठी कसरत सुरू केली व अखेर ते झाडावर चढण्यात यशस्वी झाले. परंतु पुराच्या पावसाने आंब्याच्या झाडाला सुद्धा अर्ध्या उंचीपर्यंत गाठले. एकीकडे झाडावर चढूनही पुरात डुबण्याची भिती तर अशावेळी झाडावर साप, विंचवासारखे विषारी प्राणी चढण्याची होती. या भितीमध्येच त्यांनी झाडावर घट्ट बसून तब्बल नऊ तास काढले. दुसरीकडे त्यांचा मुलगा वडीलाचा काही पत्ता लागत नसताना त्याने नाल्यापलीकडील रोंढा गावात जाऊन दुसऱ्या मार्गाने परत येण्याचे ठरविले. परंतु पुरामुळे मुख्य रस्त्यावर सर्वत्र पुलावरुन पाणी वाहत गेल्यामुळे रस्ते बंद झाले होते. शेवटी त्याने लांब फेऱ्याचा कालव्याचा रस्ता पकडून पाच सहा कि.मी. अंतर पार करीत आमगाव खुर्दला पोहोचला. परंतू वडील घरी परत आले नव्हते. शेवटी मोहल्ल्यातील युवकांनी भरत फुंडेचा शोध घेणे सुरु केले. लांब दोराच्या मदतीने तारेवरची कसरत करीत शेताच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा भरत फुंडे आंब्याच्या झाडावर दिवसभर बसून असल्याचे कळले. युवकांनी त्यांना आपल्या कौशल्याने सुखरुप बाहेर काढले.