शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

अन् क्रिकेटप्रेमींचा झाला हिरमोड

By admin | Updated: March 27, 2015 00:32 IST

विश्वचषकात एकामागून एक सलग सात सामने जिंकून समस्त क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावलेल्या भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी उपांत्यफेरीचा महत्वपूर्ण सामना गमावला.

गोंदिया : विश्वचषकात एकामागून एक सलग सात सामने जिंकून समस्त क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावलेल्या भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी उपांत्यफेरीचा महत्वपूर्ण सामना गमावला. चार वर्षापूर्वी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर आॅस्ट्रेलियाने सहज मिळविलेला हा विजय गोंदियाकर क्रिकेटप्रेमींच्या चांगचा जिव्हारी लागला.अशा पद्धतीने निराशाजनक पराभवाने स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याने गोंदियातील क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाला. यासोबतच क्रिकेटवर सट्टा आणि स्पर्धा लावणाऱ्यांचेही अंदाज पार चुकले.गुरुवार हा कार्यालयीन कामकाजाचा दिवस असला तरी शासकीय कर्मचाऱ्यांपासून तर व्यापारी आणि विद्यार्थी वर्गाचेही लक्ष या सामन्याकडे लागले होते. त्यासाठी सकाळपासूनच अनेक जण टिव्हीसमोर बसले होते. काही शासकीय कर्मचाऱ्यांनी तर टीव्हीवर क्रिेकेट सामना पाहता यावा म्हणून खास सुटीच घेऊन टाकली होती. तर महाविद्यालयीन तरुणांनी एका ठिकाणी जमून क्रिकेट पाहण्याची योजना आखली होती. भारत जिंकल्यानंतर विजयाचा जल्लोष कसा साजरा करायचा याचेही प्लॅनिंग अनेकांनी केले होते. पण सर्वांच्या अपेक्षा आणि आशांवर पाणी फेरल्या गेले. भारतीय संघच सामना जिंकणार असा विश्वास असणाऱ्या अनेकांनी पैजा (शर्यती) लावल्या. सट्टाबाजारही दिवसभर गरम होता. आॅस्ट्रेलियन संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच भारतीय संघाला पहिला झटका बसला. त्यातच तगडी फलंदाजी करीत उभारलेला धावांचा डोंगर ३०० पेक्षा पार केला तेव्हा क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावरील भाव बदलले होते. एवढे आव्हान आपला संघ पेलू शकणार का, अशी चिंता वाटत होती. अनेकांनी आशा सोडली नव्हती. मात्र सामना पुढे-पुढे सरकत असताना जिंकण्याची आशाही मावळत गेली. (जिल्हा प्रतिनिधी)