शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अन् जिल्हाधिकारी पोहोचले बांध तलावावर

By admin | Updated: September 16, 2016 02:46 IST

शहरातील सूर्याटोला परिसरात असलेल्या बांधतलावाचे पाणी गेल्या चार ते पाच दिवसांपासून येत असलेल्या

तळ्याचे पाणी घरात : अतिक्रमणातून उभारलेली भिंत तोडण्याचे आदेश गोंदिया : शहरातील सूर्याटोला परिसरात असलेल्या बांधतलावाचे पाणी गेल्या चार ते पाच दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे तलावातून बाहेर निघून रस्त्यांवर आणि नागरिकांच्या घरात येत आहे. अतिक्रमणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये रोष वाढला. त्याची दखल घेत गुरूवारी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण काढण्याचे निर्देश न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिले. तलावातील ओव्हरफलोचे पाणी निघण्यासाठी शेतशिवाराजवळून नाला वाहतो. मात्र त्या नाल्यावर अतिक्र मण करून भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे बांधतलावाचे पाणी जाण्यासाठी मार्ग मिळत नसल्याने पाणी सुर्याटोला परीसरातून रामनगर रस्त्यांवर वाहत आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये हे पाणी शिरत आहे. रस्त्यावरही दोन ते तीन फुट पाणी वाहते. या रस्त्यावरून लोकांना येणे-जाणे कठीण झाले आहे. लहान मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे असे लोक संपूर्ण दिवस घरातील पाणी बाहेर काढण्यात व्यस्त होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून घरांत शिरलेले पाणी काढण्यात व्यस्त असल्याने त्यांचा रोजगार बुडत आहे. ही स्थिती बांधतलावर असलेल्या अतिक्रमणामुळेच उद्भवल्याची माहिती परीसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली. बांधतलाव क्षेत्रातील सूर्याटोला रोडवर ज्यांनी अतिक्र मण केले आहे अशा अतिक्र मणधारकांना अतिक्र मण काढण्यासाठी नगर परिषदेकडून नोटीस देण्यात आली आहे, असे मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी सांगितले. बांधतलावाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी लोकांच्या घरात शिरल्याने जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी यांनी सूर्याटोला तसेच बांधतलाव येथे भेट दिली व बांधतलावावर असलेले अतिक्र मण व परीसराची पाहणी केली. हे प्रकरण गंभीर असल्यामुळे बांधतलावावर असलेले अतिक्र मण तत्काळ हटविण्याचे निर्देश तहसीलदार यांनी दिले आहेत. बांधतलावाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी निघण्यासाठी कुडव्याकडे असलेल्या नाल्यावर अतिक्रमण करून बांधलेल्या भिंती तोडण्यासाठी गेल्या पाच महिन्यापूर्वीच तहसीलदारांना आदेश दिले होते. मात्र स्थिती गंभीर असल्याने दोन दिवसात हे अतिक्र मण हटविण्यात येईल व परीस्थितीवर नियंत्रण मिळविले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी या पाहणीनंतर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात या भागातील नागरिकांना सदर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)