शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अन् ‘बिंदल’ची पुनरावृत्ती टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:52 IST

सात जणांचा जीव घेणाऱ्या येथील बिंदल हॉटेल मधील आगीच्या प्रकरणाला जेमतेम वर्ष लोटले आहे. या घटनेचे भयानक चित्र व त्याचे परिणाम डोळ््यापुढे असताना शहरातील काही व्यावसायीक काही पैसे वाचविण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष .....

ठळक मुद्देहरसन हॉटेलमध्ये आगीची घटना : वेळीच उपाययोजनेने हानी टळली

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सात जणांचा जीव घेणाऱ्या येथील बिंदल हॉटेल मधील आगीच्या प्रकरणाला जेमतेम वर्ष लोटले आहे. या घटनेचे भयानक चित्र व त्याचे परिणाम डोळ््यापुढे असताना शहरातील काही व्यावसायीक काही पैसे वाचविण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. रविवारी (दि.१४) शहरातील हरसन हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन विभागाचे पथक वेळीच दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आल्याने ‘बिंदल’ची पुनरावृत्ती टळली अशीच चर्चा शहरवासीयांमध्ये आहे.२१ डिसेंबर २०१६ रोजी बिंदल हॉटेलमधील आगीची घटना जिल्ह्याच्या इतिहासात काळ््या शाईने लिहिल्या गेली. सात जणांचा बळी घेणाऱ्या या घटनेनंतर इमारत मालक व अग्निशमन विभागाच्या डोक्यावर खापरही फोडण्यात आले. यावर अग्निशमन विभागाने शहरातील हॉटेल्स, लॉन, लॉज, दवाखाने व अन्य प्रतिष्ठांनाना फायर आॅडीट करविण्यासाठी नोटीस बजाविले होते. मात्र याला फार अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे. मागील रविवारी (दि.१४) शहरातील हरसंस हॉटेल मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर शहरातील मोठे हॉटेल आणि व्यावसायीक प्रतिष्ठानांच्या फायर आॅडीटचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला. या हॉटेलचे अद्यापही फायर आॅडीट करण्यात आले नसल्याचे बोलल्या जाते. या हॉटेलमध्ये फायर इस्टिंगविशर सिलेंडर ठेवण्यात आले आहेत. येथे आगीची घटना घडताच लगेच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळीच उपाय योजना करीत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी घटना टळली. अन्यथा पुन्हा बिंदलची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती. विशेष म्हणजे, अग्निशमन विभागाने हरसन हॉटेललाही नोटीस दिली होती.६० जणांना बजावली नोटीसअग्निशमन विभागाचे निरीक्षक प्रकाश कापसे सेवानिवृत्त झाल्यानंतर छबीलाल पटले यांच्याकडे अग्निशमन विभागाचा कारभार आला. त्यांनी आतापर्यंत शहरातील केटीएस रुग्णालयाला अग्निशमन यंत्रणेतील काही दुरूस्त्यांसाठी तर अन्य खाजगी दवाखाने, लॉज, लॉन, रेस्टॉरेंट, खाजगी शाळा, हॉटेल्स, सुपर मार्केट अशा ६० व्यावसायीक प्रतिष्ठानांना फायर आॅडीटसाठी नोटीस दिले आहे. मात्र यानंतरही आत्तापर्यंत केवळ १० प्रतिष्ठानांचे फायर आॅडीट झाले असून १५ जणांनी काम सुरू केले असल्याची माहिती पटले यांनी दिली. यातून बिंदलच्या घटनेनंतरही शहरातील व्यवसायी किती जागरूक झाले याची प्रचिती येते.परवाना विभागाचेच सहकार्य नाहीशहरात किती हॉटेल्स, लॉज व अन्य प्रतिष्ठान आहेत याची माहिती नगर परिषद परवाना विभागाकडे असते. या प्रतिष्ठांनाची यादी अग्निशमन विभागाला मिळाल्यास त्यांना नोटीस देणे सोयीचे होणार आहे. मात्र परवाना विभागाकडून अशा प्रकारची यादी अग्निशमन विभागाला अद्यापही देण्यात आली नाही. परिणामी पटले यांना शहरात फिरून अशा या प्रतिष्ठानांना नोटीस द्यावे लागत असल्याने यात बराच वेळ जात आहे. एकीकडे अग्निशमन विभागात कर्मचाºयांची कमतरता असताना ही महत्वाचे कामे कशी करायची असा प्रश्न या विभागाच्या अधिकाºयांसमोर निर्माण झाला आहे.