शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात हरित क्षेत्र विकासाला लाभले ‘अमृत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:07 IST

केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत हरित क्षेत्र विकास कार्यक्रमावर जोर दिला जात आहे. त्यानुसार, शहरात नगर परिषदेच्या मालकीच्या १३ जागांच्या विकासाची कामे सुरू आहे. सन २०१६-१७ व सन २०१७- १८ अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली ही कामे असून या कामांसाठी ७३.१० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशहरात १३ कामे सुरू : अमृत योजनेतून ७३.१० लाखांचा निधी

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत हरित क्षेत्र विकास कार्यक्रमावर जोर दिला जात आहे. त्यानुसार, शहरात नगर परिषदेच्या मालकीच्या १३ जागांच्या विकासाची कामे सुरू आहे. सन २०१६-१७ व सन २०१७- १८ अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली ही कामे असून या कामांसाठी ७३.१० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या जागांवर बाग तयार करावयाचे असून हरित क्षेत्र विकासाच्या कामांना एकप्रकारे ‘अमृत’च लाभले असल्याचे म्हणता येईल.गोंदिया शहराचा सर्वच क्षेत्रात विकास होत असला तरिही हरित क्षेत्राच्या बाबतीत शहर मागासलेलेच आहे. आजघडीला शहरात सिव्हील लाईन्स परिसरातील सुभाष बाग हे एकच बाग उरले असून याशिवाय दुसरे हिरवळीचे स्थान नाही. मात्र देखभाल दुरूस्ती अभावी सुभाष बागेचीही स्थिती काही बरी नाही. नगर परिषदेकडून बागेला रेटत चालल्याचे दिसून येत आहे. शहरातील पिंडकेपार व कुडवा येथे नवे बाग तयार केले जात आहे. मात्र सध्यातरी शहरवासीयांना मोकळ््या हवेत श्वास घेण्यासाठी दुसरी जागाच उरलेली नाही. हीच बाब हेरून केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पावर गांभीर्याने लक्ष दिले जात आहे.यातूनच, शहरातील हरित क्षेत्र विकासासाठी सन २०१६-१७ अंतर्गत नगर परिषदेच्या मालकीच्या सात जागा तसेच सन २०१७-१८ अंतर्गत सहा जागांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या जागांवर विविध कामे करून विकास करायचा व बाग तयार करण्याचे यात प्रस्तावीत होते. यातील सन २०१६-१७ मध्ये प्रस्तावीत करण्यात आलेल्या सात कामांसाठी ‘अमृत’ योजनेंतर्गत ४२ लाख १० हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.तर सन २०१७-१८ अंतर्गत प्रस्तावीत सहा कामांसाठी ३१ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना १८ नोव्हेंबर २०१७ मध्ये मंजुरी मिळाली असून ही कामे सुरू आहेत. ही कामे पुर्ण झाल्यानंतर शहर नक्कीच हिरवळ दिसून येणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.येथील जागांचा होणार विकाससन २०१६-१७ मध्ये नगर परिषदेच्या मालकीच्या गणेशनगर परिसरातील चार, द्वारकानगरातील एक, कटंगीकला येथील एक व पैकनटोली बजाज वॉर्डातील एका जागेचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तर सन २०१७-१८ मध्ये मालवीय वॉर्डातील एक, लक्ष्मीनगर बँक कॉलनीतील एक, जुनेजा कॉलनीतील एक, गौरीनगरातील एक, कटंगीकला येथील एक, व महात्मा फुले वॉर्डातील एक जागा प्रस्तावीत करण्यात आली होती.पिंडकेपार व डोंगरतलावचे काम प्रगतीपथावरहरितक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१५-१६ मध्ये शहरातील पिंडकेपार व डोंगरतलाव येथील कामे प्रस्तावीत करण्यात आली होती. या कामांना १३ जुलै २०१७ रोजी मंजुरी मिळाली असून या कामांसाठी ७१ लाख ५९ हजार ५०० रूपयांचा निधी मिळाला आहे. ही कामे सध्या प्रगतीपथावर असून यात पाथवे, सुरक्षा भिंत, लॉन, वृक्षारोपण आदि कामे केली जाणार आहेत. एकंदर बाग तयार केली जाणार आहे.