शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आमगावचे उपडाकघर वाऱ्यावर

By admin | Updated: September 29, 2016 00:28 IST

आमगाव तालुक्यात एकमेव उप डाकघर आहे. लाखोची लोकसंख्या असलेल्या या डाक कार्यालयात अनेक योजनांमध्ये लोक पैसे गुंतवितात.

पोस्टमास्तरांची दबंगशाही : खाते उघडणे बंद केल्याचा लावला फलकआमगाव : आमगाव तालुक्यात एकमेव उप डाकघर आहे. लाखोची लोकसंख्या असलेल्या या डाक कार्यालयात अनेक योजनांमध्ये लोक पैसे गुंतवितात. याकरीता अनेक एजेंट मेहनत करून नविन खाते उघडणे, फीक्स डिपाजीट, सुकन्या योजना इत्यादीचे कामे करतात. परंतु आमगाव डाक कार्यालयात पोस्ट मास्तर विजय उके यांच्या दबंगशाहीमुळे पोस्टचा व्यवहार ठप्प पडला आहे. शासनाचे लाखोचे नुकसान होत आहे. या डाक कार्यालयात कोर-बॅकीग सुविधा असून महिन्याकाठी जवळपास एक कोटी रुपयाची देवाण-घेवाण होत असते. डाक कार्यालयाची वेळ सकाळी ८ ते ४ असून ग्राहक आणि एजेंट सकाळी देवाण-घेवाण करीता पोहचतात. परंतु पोस्ट मास्तर उशीरा येतात. सर्व कामे नेट बॅकींगने होत असून पोस्ट मास्तरांना संगणकाचे ज्ञान नाही. कर्मचाऱ्यांची कमतरता असून फक्त तीनच कर्मचारी कार्यरत आहेत. डाक कार्यालयात ग्राहक खाते उघडण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी गेले तर त्यांना पैसे काढण्याची विड्राल फार्म दिल्या जात नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. देवाण-घेवाण संदर्भात पोस्ट मास्तर ग्राहकांशी एजेंटाशी उद्धटपणे बोलतात. एवढेच नव्हे तर पोस्ट मास्तरांनी खाते उघडणे बंद असल्याचे आदेश लावले आहे. एजेंटची कामे कित्येक दिवस प्रलंबित असतात. एजेंट नविन खातेधारकांना खाते उघडायला आणले असता त्यांचे खाते उघडल्यानंतर १ महिन्या पर्यंत पासबुक दिल्या जात नाही. प्रिंटर एक महिन्यापासून बंद पडले आहे. प्रिंटर दुरूस्तीसाठी कुठलीही उपाययोजना केली नाही. एजेंट आरडीचे पैसे जमा करण्यास गेले असता लिंक फेल असल्याचे कारण सांगून १५-१५ दिवस पैसे जमा केले जात नाही. यामुळे एजेंटचे नुकसान होत आहे. पोस्ट आॅफीसच्या या व्यवहारामुळे एजेंटचे उपजिवीकेचे साधन ठप्प पडले आहे. तालुक्यातील सर्व एजेंटनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. १५ दिवसात पर्यायी व्यवस्था न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)