शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

चिचगडच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By admin | Updated: August 9, 2015 01:50 IST

तालुक्यातील नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चिचगड ...

अत्याधुनिक सोयी : पुराम यांनी घेतला पुढाकारदेवरी : तालुक्यातील नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात सुसज्ज अशा रुग्णवाहिकेचे लोकार्पण शुक्रवारी आ.संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम झाले. सकाळी १० वाजता ग्रामीण रुग्णालयात आ.पुराम यांच्या उपस्थितीत भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार यांच्या हस्ते रुग्णांना फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी महामंत्री विरेंद्र अंजनकर, सभापती देवकी मरई, माजी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, पं.स.सदस्य महेंद्र मेश्राम, प्रवीण दहीकर, इंदरजितसिंग भाटीया आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.यानंतर शासकीय आश्रमशाळा बोरगाव बाजार येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आमदारांचा विशेष सत्कार केला. आश्रमशाळा परिसरात पुराम व भाजप कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याच आश्रमशाळेच्या भवनात शेकडो रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. काही रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात अली. आ.पुराम यांच्या मदतीने त्यांच्यावर नागपूर येथे पुढील शस्त्रक्रिया केली जाणार आहे. नेत्र तपासणीसाठी देवरीसोबतच लगतच्या सालेकसा, आमगाव तालुक्यातूनही स्त्री-पुरूषांनी गर्दी केली होती. या शिबिरानंतर चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या सेवेकरिता १०८ क्रमांकावरून उपलब्ध होणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी आमदार रामरतन राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी व परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. यावेळी आ.पुराम यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा संपूर्ण दिवस समाजोपयोगी कार्यक्रमात व्यस्त असल्याचे समाधान मिळाल्याचे आ.पुराम म्हणाले. (प्रतिनिधी)