शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आमगाववासीय चार दिवसांपासून तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:37 IST

आमगाव शहराला मागील चार दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा पुरवठा ठप्प आहे. परिणामी शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा ठप्प : प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप

आॅनलाईन लोकमतआमगाव : आमगाव शहराला मागील चार दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा पुरवठा ठप्प आहे. परिणामी शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरवासीय तहानलेले असताना प्रशासनाने मात्र यावर कुठलीही उपाययोजना केलेली नाही.आमगाव येथे सध्या नगरपरिषद निवडणुकीवरुन राजकीय वातावरण तापले आहे. सर्वोच्य न्यायालयाने आमगाव नगर परिषद निवडणुक रद्दच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे राजकीय पुढारी आणि प्रशासन सुध्दा याच कामात व्यस्त आहे. परिणामी शहरवासीयांच्या समस्यांकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. आमगाव येथे चार दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असून त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे नागरिकांत तीव्र असंतोष आहे. सामन्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यासाठी नगर परिषद संघर्ष समिती शिवाय कुणीही राजकीय पुढारी अथवा स्थानिक लोकप्रतिनिधी पुढे आले नाहीत. त्यामुळे शहरवासीयांची समस्या अद्यापही कायम आहे. नगर परिषद निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय नेते व्यस्त असल्याचे चित्र आहे. त्यांना नागरिकांच्या प्रश्नांशी काही घेणे देणे नाही. आमगाव शहराला बनगाव पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या चार दिवसांपासून अचानक पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. मात्र त्या मागील कारणाचा शोध घेवून पाणी पुरवठा सुरळीत करण्याठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे चित्र शहरात आहे. त्यामुळे नागरिकांनी यासर्व प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.मुलभूत सुविधांकडे दुर्लक्षशहरातील शौचालयाचा प्रश्न, घरकुलांची समस्या, जमीन हक्काचा प्रश्न, सांडपाणी, रस्ते, पिण्याच्या पाण्याचे नियोजन व पुर्ततेचा प्रश्न असे अनेक प्रश्नांवर राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी गप्प असल्याने शहरवासीयांच्या समस्या अद्यापही कायम आहे.पाणी पुरवठा सयंत्रामधील व्हॉल्व खराब झाल्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. ते बदलण्यासाठी काम सुरू आहे. पुढील काही दिवसांत पाणी पुरवठा पूर्ववत होईल.-साहेबराव राठोड,प्रशासक तथा तहसीलदार, आमगाव