शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हितासाठी सदैव तत्पर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:54 IST

गोंदिया : राज्यात सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याचे काम केले. मागील वर्षी राज्य सरकार कोरोनामुळे आर्थिक ...

गोंदिया : राज्यात सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याचे काम केले. मागील वर्षी राज्य सरकार कोरोनामुळे आर्थिक संकटात होती. तरीही धान उत्पादकांसाठी १४०० कोटी रुपयांच्या बोनसला मंजुरी देण्यात आली. या वर्षीही २००० कोटी रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांना स्वरूपात मिळणार आहेत. जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

तालुक्यातील ग्राम गोवारीटोला (निंबा) येथील भास्कर मेंढे यांच्या निवासस्थानी प्रांगणात शुक्रवारी (दि.१२) राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, खुशाल बोपचे, केवल बघेले, रविकांत बोपचे, रामू हरिणखेडे, सोमेश रहांगडाले, के. के. डोंगरे, बाबा बहेकार, बाबा बोपचे, भास्कर मेंढे, कल्पना बहेकार, अनिता तुरकर, देवचंद सोनवाने, लालचंद चव्हाण, सुरेंद्र रहांगडाले, चौकलाल येडे, गणेश पारधी, आनंद बडोले उपस्थित होते.

याप्रसंगी खासदार पटेल यांनी परिसरातील नागरिक व पक्षातील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच स्थानिक समस्यांवर संवाद साधला. तसेच येत्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे असे सांगत महाविकास आघाडीने केलेले कार्य जनते पर्यंत पोहचविण्यासाठी सक्रीयतेे कार्य करा असे सांगीतले.

याप्रसंगी खासदार पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.