शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्याची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा मागासवर्गीय मेरिट विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्यास परवानगी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.निवेदनानुसार, खुल्या प्रवर्गातून मागासवर्गीयांना (एससी, एसटी, ओबीसी, ...

ठळक मुद्देएमपीएससी स्पर्धा परीक्षा : ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा मागासवर्गीय मेरिट विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्यास परवानगी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.निवेदनानुसार, खुल्या प्रवर्गातून मागासवर्गीयांना (एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी, एनटी) अर्ज भरण्यास प्रवेश नाकारणे म्हणजे १५ टक्के लोकांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवणे होय. आधीच सरकारच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयाने आरक्षण (राखीव जागा) ५० टक्के मर्यादित केलेल्या आहेत. यात शोषित-पीडित-बहुजन ८५ टक्के मागासवर्गीय समाजाला बंदिस्त करून उर्वरित ५० टके जागा उच्चवर्णीयांसाठी राखीव करण्यात आले असून, हे १५ टक्के समाजासाठी केलेली अप्रत्यक्ष आरक्षणाची तरतूद होय. खुल्या प्रवर्गातून मेरिटला नाकारणे म्हणजेच मागासवर्गीय मेरिट विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.असा अन्याय ओबीसी संघर्ष कृती समिती व समविचारी संघटन खपवून घेणार नाही. जर शासनाने अशा प्रकारचा मनुवादी छुपा अजेंडा राबविला तर याचे तीव्र पडसाद भोगावे लागतील व निर्माण होणाºया परिस्थितीला शासन-प्रशासन जबाबदार असेल. त्यामुळे वेळीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाºया परीक्षांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आधीप्रमाणे अर्ज करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी संघटनेचे खेमेंद्र कटरे, कैलाश भेलावे, नागेश ठाकूर, प्रेमलाल गायधने, तिर्थराज उके, सावन डोये, चंदू बहेकार, शरद मेश्राम, राजकुमार खोब्रागडे आदी उपस्थित होते.