शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

आई-वडिलांचे छत्र हिरावलेल्यांना कपड्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:19 IST

वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. दिवाळी म्हणजे एक नव पर्व. घरामध्ये सर्वत्र आनंदी आनंद वातावरण. त्यातही बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही.

ठळक मुद्देसविता बेदरकर यांचा पुढाकार : अनाथ मुलांसह दिवाळी स्रेहमिलन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. दिवाळी म्हणजे एक नव पर्व. घरामध्ये सर्वत्र आनंदी आनंद वातावरण. त्यातही बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही. नव्या क्षितीजाप्रमाणे घरात नवचैतन्य उजळून येते.फटाक्याची आतषबाजी, नव्या कपड्याची नवलाई, गोड गोड धोड पंचपक्वान्न खाण्याची इच्छा असते. मात्र हे सर्व केवळ ज्यांचे आई वडील आहेत त्याच मुलांना मिळते. परंतु आई-वडिलांचे छत्र हिरावलेल्या अनाथ बालकांना सुद्धा या सर्व गोष्टींचा आनंद मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी पुढाकार घेवून अनाथ बालकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला.जिल्ह्यातल अर्जुनी मोरगाव तालुक्यासह अन्य ठिकाणच्या ४२ अनाथ वंचित गरीब मुलांना वेळोवेळी अन्नधान्यासह किराणा सामान, शालेय साहित्य व इतर आवश्यक वस्तुंचा पुरवठा अनाथाची माय म्हणून ओळखल्या जाणाºया प्रा. बेदरकर वेळोवेळी दानदात्यांच्या सहकार्यानी करीत असतात. ज्या वंचितांचे मायबापच दृष्ट काळाने एकाएकी हिरावून नेल्याने त्या कुटुंबावर मोठा आघात होऊन जन्मदात्याविना त्या मुलांची वाताहात होते. दु:ख सावरता येत नाही. दिवाळीच्या दिवशी नवीन कपडे, फटाके, मिठाई कोण देणार असे नानाविध प्रश्न निर्माण होतात. ईतर मुलांप्रमाणे अनाथ मुलांची दिवाळी आनंदाची जावी, त्यांच्यात नवचैतन्य निर्माण व्हावे या हेतूने गोंदिया शहरातील विविध दानशुरांच्या मदतीने बेदरकर मागील काही वर्षापासून आपल्याच निवासस्थानी जिल्ह्यातील अनाथ मुलांचा दिवाळी मनोमिलनाचा एक अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे. नुकताच हा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी पार पडला. या वेळी अनाथ बालकांना नवीन कपडे, मिठाई व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. अनाथ मुलांचे दिवाळी मनोमिलन या अभूतपूर्व सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी माजी जि.प. उपाध्यक्ष तथा मांडोदेवी देवस्थानचे सचिव विनोद अग्रवाल, जि.प.माजी सभापती आरती चवारे, समाजशिल शिक्षक अनिल मेश्राम, सृजन सामाजिक संस्थेचे विजय ठवरे, वशिष्ठ खोब्रागडे, वरुण खंगार, प्रणाली ठवरे, पूजा खंगार, त्रिशा खंगार, सुनिता खोब्रागडे, देवानंद भांडारकर, पंकज दियेवार, निखील खंगार, प्रमोद गुडधे उपस्थित होते. या कौटुंबिक मनोमिलन कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकर अमरचंद ठवरे यांनी केले.कपडे, मिठाई, अल्पोपहाराचे वाटपजिल्ह्यातील ठिकठिकाणच्या ४२ अनाथ, वंचित, गरीब मुला-मुलींच्या चंद्रमोळी झोपडीत सुख-शांती आनंदाचा झरा पाझरावा यासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या अनाथ बालकांना नवीन कपडे, स्वेटर, ब्लेंकेट, शालेय साहित्य, दिवाळीचा गोड फराळ व रोख रक्कम देण्यात आली. सुखी आयुष्याबद्दल मनोकामना देवून आशीर्वाद देण्यात आले.दानशूर आले पुढेजिल्ह्यातील ४२ अनाथ मुलांना दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी गोंदियातील अनेक दानशुर पुढे आले. डॉ. राजेंद्र जैन, डॉ. निमगडे, सई अभिमन्यू काळे, अजय कोठेवार, विनोद अग्रवाल, आरती चवारे, सुनील केलनका, डॉ. नामदेव किरसान, भरत क्षत्रीय, सोंटू जैन, सुनील तरोणे, अजय जायस्वाल, रामअवतार अग्रवाल, चाईथराम गोपलानी, यशोदा सोनवाने, नानक बिसेन, शारदा सोनसावरे, मिना डुंबरे, वुमेन्स विंग, वरुण खंगार, वशिष्ट खोब्रागडे, पशिने, सुनंदा बिसेन, निरज वाधवानी, राकेश आहुजा, मधू बन्सोड, सीमा डोये, लता बाजपेयी, डॉ. सचिन चौधरी, डॉ.गोपाल हलमारे, डॉ.शंकर बनोटे, डॉ.छाया लंजे, दिनेश अग्रवाल, गुलशन बिसेन, डायट संस्थेचे राजकुमार हिवाडे, टी.जी. तुरकर, डॉ. दिशा गेडाम, पौर्णिमा मिश्रा, कनक सोनकवरे, वरुण खंगार, पुजा खंगार, विजय बहेकार, अ‍ॅड. भौतिक, पंकज दियेवार, नितेश नागपुरे यांच्यासह विविध मान्यवरांचा समावेश होता.