शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वनसमितीच्या वतीने गॅस कनेक्शनचे वाटप

By admin | Updated: May 7, 2016 01:49 IST

वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत ताडगाव येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने गावातील गरजू लाभार्थ्यांना ८२ एलपीजी गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.

बोंडगावदेवी : वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत ताडगाव येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने गावातील गरजू लाभार्थ्यांना ८२ एलपीजी गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.ताडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा येथे आयोजित गॅस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्रापंचायत सरपंच रेखा मडावी होते. याप्रसंगी वनपरिक्षेत्राधिकारी सी.जे. रहांगडाले, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चोपराम मेश्राम, सचिव डी.सी. बरडे, वनसमितीचे उपाध्यक्ष प्रविण सयाम प्रामुख्याने उपस्थित होते.गॅस वितरण समारंभाला उपस्थित महिला-पुरुषांना मार्गदर्शन करताना वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडाले म्हणाले, गावाच्या सहकार्याने संयुक्त वन व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली आहे. वन समितीमध्ये संपूर्ण ग्रामस्थांचा सहभाग आहे. आपल्या गावातील जंगलाचे संगोपन करुन जंगल वाढीसाठी ग्रामस्थांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले, जंगलातील संपत्ती ही गावकऱ्यांची आहे. तिचे जतन करणे सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. जंगलापासून ग्रामस्थांचे स्वास्थ्य निरोगी राहून विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. जंगलतोड होऊ नये तसेच महिलांना धुरांपासून संरक्षण मिळावे यासाठी वन व्यवस्थापन समितीच्या वतीने एलपीजी गॅस कनेक्शन गावकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील असल्याचे आरएफओ रहांगडाले यांनी सांगितले. गावाच्या विकासात हातभार लावण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.या वेळी गावातील ८२ गरजू लाभार्थ्यांना नवीन एलपीजी गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. वन रक्षक डी.सी. बरडे यांनी संचालन करुन आभार मानले. या वेळी लाभार्थ्यांसह वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच इंडेन गॅस अर्जुनी मोरगावचे वितरक प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)