शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

२.६० कोटींचा बोनस ६२.४० टक्क्यांनी होणार वाटप

By admin | Updated: January 5, 2017 00:51 IST

तेंदू हंगामाची प्रोत्साहनार्थ मजुरी (बोनस) पाच कोटी ७६ लाख रूपये वन विभागाला वाटप करावयाचे होते.

तेंदूपाने संकलनकर्त्यांना लाभ : ३४.२८ टक्क्यांनी ३.१६ कोटींचे वाटप गोंदिया : तेंदू हंगामाची प्रोत्साहनार्थ मजुरी (बोनस) पाच कोटी ७६ लाख रूपये वन विभागाला वाटप करावयाचे होते. यापैकी ३.१६ कोटी रूपये ३४.२८ टक्केवारीनुसार मजुरांना वाटप करण्यात आले. तर आता नवीन आदेशाने उर्वरित २.६० कोटी रूपये ६२.४० टक्क्यांनी सरसकट मजुरांच्या खात्यात घालण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सन २०१४ तेंदू हंगामाच्या बोनस वाटप अहवालानुसार, एकूण ४८ हजार ०४२ मजुरांना चार कोटी २८ लाख ३५ हजार ०७९ रूपयांची प्रोत्साहनार्थ मजुरी वाटप करावयाची होती. त्यातही ५०० रूपयांच्या आतील रोखीने तर ५०० रूपयांच्या वरील रक्कम धनादेशाने द्यायचे होते. त्यानुसार ५०० रूपयांच्या आतील २१ हजार ०३३ मजुरांना ५२ लाख ८० हजार ६७८ रूपये रोखीने व २७ हजार ०१९ मजुरांना तीन कोटी ७५ लाख ५४ हजार ४०१ रूपये धनादेशाद्वारे वाटप करावयाचे होते. यापैकी २० हजार ९९७ मजुरांना रोखीने ५२ लाख ७४ हजार ७३७ रूपये व धनादेशाद्वारे २६ हजार ६२५ मजुरांना तीन कोटी ६७ लाख ३५ हजार ३११ रूपये वाटप करण्यात आले. अशा एकूण ४७ हजार ६२२ मजुरांना चार कोटी २० लाख १० हजार ०४८ रूपये वाटप करण्यात आले. तरी २७ नोव्हेंबर २०१६ पर्यंत आठ लाख २५ हजार ०३१ रूपयांचे बोनस वाटप करणे बाकी आहे.सन २०१५ तेंदू हंगामात ४२ हजार ४४३ मजुरांना तीन कोटी १६ लाख ३७ हजार ६६८ रूपये वाटप करावयाचे होते. यात ५०० रूपयांच्या आतील व वरील सर्वच प्रकारच्या मजुरांना धनादेशाद्वारे किंवा सरळ मजुरांच्या बँक खात्यात जमा करावयाचे असल्याने रोखीने व्यवहार करण्यात आलेला नाही. यापैकी एकूण ३२ हजार १०१ मजुरांना धनादेशाद्वारे दोन कोटी ८५ लाख ५७ हजार ८७७ रूपये धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले. काही मजुरांचे, कुटुंबप्रमुखांचे खाते उपलब्ध नसल्यामुळे ही रक्कम शिल्लक आहे, मात्र येत्या ३१ मार्चपर्यंत ही रक्कम वाटप करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी) ंआता रोखीने व्यवहार न करण्याचे आदेश प्रोत्साहनार्थ मजुरी वाटपाच्या मान्य प्रस्तावात सन २०१५ मधील तेंदू हंगामातील प्रोत्साहनार्थ मजुरी वाटपाची टक्केवारी ६४.४० निश्चित करण्यात आले आहे. तेंदूपाणे संकलनकर्त्यांना बोनस वाटपाची कार्यवाही शासन निर्णयात नमूद तरतुदी व कार्यालयाकडून जाहीर केलेल्या निर्देशांच्या अधिन राहून तात्काळ करण्याच्या सूचना आहेत. सन २०१५ च्या हंगामातील संकलनकर्त्यांना बोनस वाटपाची प्रगती दर मंगळवारी फॅक्स किंवा ई-मेलद्वारे सादर करण्याचीही सूचना आहे. तसेच सन २०१४ तेंदू हंगामातील तेंदूपाणे संकलनकर्त्या कुटुंबप्रमुखास ५०० रूपयांच्या आत वाटप करणारी प्रोत्साहन मजुरीची रक्कमदेखील रोखीने न वाटता संबंधितांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश आहेत.