शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना संगणकीकृत प्रमाणपत्राचे वाटप करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 20:41 IST

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना आता संगणकीकृत दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री बडोले : तीन दिवसीय शिबिराचे आयोजन

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना आता संगणकीकृत दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अनेक दिव्यांग बांधव त्यांना आवश्यक असलेल्या कृत्रिम साहित्यापासून वंचित आहे. त्यांना प्रमाणपत्र व साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी २० ते २३ मार्च दरम्यान गोंदिया येथे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी कळविले.जिल्हाधिकारी कार्यालयात या शिबिराच्या पुर्वतयारीच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अपूर्व पावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, जिल्हा नियोजन अधिकारी भूत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, अभिजीत चौधरी उपस्थित होते. बडोले म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने हे शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील दुर्गम भागातील दिव्यांग बांधवांना शिबिराला आणण्याचे काम तालुका यंत्रणेने नियोजनातून करावे. प्रत्येक ग्रामपंचायतीला दिव्यांग बांधवांसाठी ३ टक्के निधी दिला आहे.त्या निधीचा वापर यासाठी ग्रामपंचायतीने करावा. जिल्ह्यातील आठ तालुक्यासाठी चार ठिकाणी हे शिबिर घेण्यात येणार असल्याचे सांगितले. दयानिधी म्हणाले, जिल्हा परिषदेची यंत्रणा शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. दिव्यांग बांधवांना त्यांना हवे असलेले प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्रास सहन करण्याची वेळ या शिबिरामुळे येणार नाही.आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामसेवक या शिबिरात सहकार्य करतील असे त्यांनी सांगितले. चौधरी यांनी या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. आशा सेवकांचे प्रशिक्षण घेण्यात येईल असे सांगितले. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्ेत उपस्थित होते.घरपोच मिळणार प्रमाणपत्रदिव्यांगांना प्रमाणपत्र स्पीड पोष्टने घरपोच तपासणीनंतर पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या विशेष मोहीम शिबिरात नोडल अधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी हे काम करणार आहे. गावस्तरावरील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाºया यंत्रणा जसे- जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, सर्व शिक्षा अभियान, विशेष शाळा, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्र म, दिव्यांगाच्या विविध संघटना, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींना शिबिराबाबतची माहिती व शिबिरास्थळी आणण्याचे काम करण्यात येणार आहे.दोन टप्प्यात शिबिरपहिला टप्पा प्राथमिक तपासणी प्रत्येक तालुक्यात दोन ठिकाणी व प्रत्येक दिवशी दोन शिबिरे असे एकूण २० शिबिराकरीता केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व ग्रामीण रु ग्णालय येथे तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध करु न निश्चित दिवशी शिबिर घेण्यात येईल. दुसºया टप्प्यात अपंगत्व निदान व निश्चितीकरण करु न शिबिराकरीता अपंगत्व प्रमाणपत्र बोर्ड तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी केटीएस, शासकीय महाविद्यालय तसेच ग्रामीण रु ग्णालय येथे शिबिर घेण्यात येईल.प्रशिक्षणातून देणार माहितीआरोग्य विभागामार्फत कार्यरत जिल्हा आशा समन्वयक यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा व तालुका समन्वयक, विशेष शिक्षक, शालेय आरोग्य तपासणी पथक, प्रत्येक तालुक्यातील दोन डॉक्टर, विशेष शाळेतील दोन विशेष शिक्षक, दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी यांचे जिल्हास्तरावर दिव्यांग लाभार्थी माहितीसाठी एक दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. गावातील दिव्यांग व्यक्तीची माहिती विहीत प्रपत्रात आशा सेविकेकडून प्राप्त करण्यासाठी उपरोक्त यंत्रणेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आशा सेविकांचे प्रशिक्षण व आशा सेविकेमार्फत सात दिवसात जिल्हा आशा समन्वयक मार्फत समाज कल्याण विभागाला माहिती देण्यात येईल.