शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

निकालानंतर सर्वच पक्षांचे दावे प्रतिदावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 21:56 IST

जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी (दि.१७) रोजी जाहीर झाले. यानंतर भाजप, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस या सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाचे समर्थन असलेले सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याचा दावा केला.

ठळक मुद्देमतदार संभ्रमात : ग्रामपंचायत निवडणूक, गाठीभेटीचे सत्र सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी (दि.१७) रोजी जाहीर झाले. यानंतर भाजप, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस या सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाचे समर्थन असलेले सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याचा दावा केला. यावरुन काही पक्षांच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला. सर्वच पक्षांनी दावे प्रतिदावे केल्याने मतदार मात्र अद्यापही संभ्रमात असल्याचे चित्र आहे.निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र यापैकी ३ ग्रामपंचायतीची निवडणूक आक्षेप घेतल्याने रद्द झाली. तर तीन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यामुळे उर्वरित ३४१ ग्रामपंचायतीसाठी १६ आॅक्टोबरला निवडणूक घेण्यात आली. ३४७ सरपंचपदासाठी एकूण १०५७ तर २९७४ सदस्यपदासाठी ८ हजार सदस्य निवडणूक रिंगणात होते. मंगळवारी निकालानंतर आमगाव, सडक-अर्जुनी, तिरोडा तालुक्यात राष्टÑवादी काँग्रेसचे सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा त्या पक्षाच्या नेत्यांनी केला. तर देवरी तालुक्यात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या पक्षाचे समर्थन असलेले सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा केला. तर हीच स्थिती गोंदिया, गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात कायम होती. येथे सुध्दा सर्वच राजकीय पक्षांनी समर्थन असलेले सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा केला.यावरुन काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वाद देखील झाले. काही पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक निकालानंतर लगेच प्रसिध्दी पत्रक काढून आपल्या पक्षाचे समर्थन असलेले सर्वाधिक सरपंच कसे निवडून आले, याची यादीच पाठविली. तर काहींनी आकड्यांचे गणित सुध्दा जुळवून पाठविली. सर्वच पक्षांनी वर्तमानपत्राच्या कार्यालयांना सर्वाधिक जागा निवडून आल्याचे प्रसिध्दपत्रक पाठवून आपल्या पक्षाचे सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा केला. त्यामुळे नेमके कुठल्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले हे कळायला मतदारांना मार्ग नाही.सरपंच, सदस्यांची मनधरणीजिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर आपले पक्षाचे वर्चस्व असावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडून आलेले सरपंच आणि सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र आहे. यासाठी त्या त्या गावातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.अपक्ष सदस्यांकडे लक्षग्रामपंचायतीत निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले अपक्ष सरपंच आणि सदस्य हे आता कुठली भूमिका घेतात. अपक्ष म्हणून राहतात की कुठल्या पक्षात प्रवेश करतात याकडे गावकºयांचे लक्ष लागले आहे.थेट निवडीने उत्सुकता संपलीयंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात आली. शिवाय निवडून आलेल्या सरपंचावर अडीच वर्षे अविश्वास आणता येणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता स्थापन होणार, सरपंचपदी कोण आरुढ होणार याबाबत पूर्वी असलेली उत्सुकता थेट सरपंच निवडीने आता संपुष्टात आली.सरपंचांना छाप सोडण्याची संधीसरपंचपदी निवडून आलेल्यांना ग्रामपंचायतचा कारभार साभाळतांना आता कुठलीही अडचण नाही. त्यामुळे सरपंचांने गाव विकासाची रुपरेषा आखून कामे केल्यास मतदारांवर छाप सोडण्याची संधी मिळणार आहे. शिवाय गावाचा सर्वांगिन विकास करुन गावकºयांसमोर आदर्श ठेवता येणार आहे.