गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी गोंदियात विधानसभा मतदार संघात रिंगणात उभे असलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची व त्यांच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती कोट्यवधीच्या घरात आहे. यात सर्वात आघाडीवर काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल असून सर्वात कमी संपत्ती बसपाचे मामा बन्सोड यांच्याकडे आहे. विनोदकुमार संतोषकुमार अग्रवाल हे भारतीय जनता पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांनी स्वत:च्या नावे एक लाख ९८ हजार ९४० रूपये तर पत्नीच्या नावे १ लाख ९८ हजार ०७५ रूपयांची असल्याचे दाखविले आहे. त्यांच्या स्वत:च्या नावे ४२ लाख ४३ हजार ४९१ रूपयांची तर पत्नीच्या नावे ९ लाख ४५ हजार ४५६ रूपयांची अस्थायी मालमत्ता असल्याचे दाखविले आहे. तसेच स्वत:च्या नावे २७ लाख ७८ हजार २३१ रूपयांची तर पत्नीच्या नावे ५२ लाख ८७ हजार ५०० रूपयांची स्थायी संपत्ती असल्याचे दाखविले आहे. स्थायी संपत्तीच्या विकास व सुधारणेसाठी ६ हजार २२३ रूपयांची नोंद आहे. आजच्या बाजारपेठेच्या दरानुसार त्यांच्या नावे असलेल्या स्थायी संपत्तीचे दर ८१ लाख ७२ हजार ७२७ रूपये तर पत्नीच्या नावे असलेल्या संपत्तीचे दर ३ कोटी ५४ लाख ७० हजार ३९५ रूपये असल्याचे दाखविले आहे. तर अनुवंशिकरीत्या मिळालेल्या संपत्तीची किंमत १६ लाख ८२ हजार १५६ रूपये आहे. तसेच बँक किंवा इतर संस्थाकडून असलेले ४४ लाख ८० हजार रूपये कर्ज असल्याचे दाखविले आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुकीत उभे असलेले राजकुमार संपतराव कुथे यांनी इंकम टॅक्स रिटर्न फिल्डच्या सन २०१३-१४ मध्ये स्वत:च्या नावे ५ लाख ४४ हजार ०७६ रूपये व पत्नीच्या नावे सन २०१२-१३ नुसार एक लाख ८१ हजार १५० रूपये असल्याचे दाखविले आहे. त्यांच्या स्वत:च्या नावे ४३ लाख ४२ हजार ३९४ रूपयांची तर पत्नीच्या नावे ८ लाख २७ हजार ३५९ रूपयांची अस्थायी संपत्ती असल्याचे दाखविले आहे. त्यांनी २८ लाख ३५ हजार ५६२ रूपयांची स्थायी संपत्ती स्वत: मिळविल्याचे तर त्या संपत्तीच्या विकास व सुधारणेसाठी ६ लाख ८० हजार रूपयांचा खर्च दाखविला आहे. त्यांनी स्वत: मिळविलेल्या स्थायी संपत्तीचा दर आजच्या बाजारपेठेनुसार १ कोटी ११ लाख ५६ हजार रूपये आहे. तर बँक व इतर संस्थांकडून ४२ लाख ३ हजार ७८८ रूपयांचा कर्ज असल्याचे दाखविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढणारे अशोक (गप्पू) गुप्ता यांनी इन्कम टॅक्ट रिटर्न फाईल केल्यानुसार सन २०१२-१३ नुसार ४ लाख ५४ हजार ९०० रूपये तर पत्नीच्या नावे २ लाख १५ हजार ९९० रूपये असल्याचे दाखविले आहे. त्यांच्या स्वत:च्या नावे १ कोटी ४६ लाख ५३ हजार ९५५ रूपयांची व पत्नीच्या नावे ५ लाख २९ हजार ८०० रूपयांची अस्थायी संपत्ती असल्याचे दाखविले आहे. तसेच त्यांनी १७ लाख ३९ हजार ७०० रूपयांची स्थायी संपत्ती स्वत: मिळविल्याचे दाखविले आहे. आजच्या बाजारपेठेनुसार त्यांच्या अस्थायी संपत्तीचे दर २५ लाख ५० हजार रूपये आहे. तसेच त्यांच्यावर बँक व इतर संस्थेकडून ८४ लाख ८६ हजार ९९२ रूपयांचे कर्ज असल्याचे दाखविले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडणूक लढणारे व विद्यमान आ. गोपालदास शंकरलाल अग्रवाल यांनी सन २०१३-१३ नुसार स्वत:च्या नावे ७ लाख ६४ हजार ९०६ रूपये, एचयूएफ-१ च्या नावे ७ लाख ८२ हजार १७८ रूपये असल्याचे दाखविले आहे. तसेच गोपालदास राजकुमार अग्रवाल या नावे एक लाख ९८ हजार ३५० रूपये तर पत्नी उमादेवीच्या नावे ८ लाख ४९ हजार ७४७ रूपये असल्याचे दाखविले आहे. त्यांच्या नावे अस्थायी संपत्ती ७७ लाख २ हजार २६१ रूपये व २३ लाख ११ हजार ७७४ रूपये तर पत्नीच्या नावे १ कोटी ४ लाख ४० हजार ७११ रूपयांची अस्थायी संपत्ती असल्याचे दाखविले आहे. तसेच त्यांनी ४३ लाख ४८ हजार रूपयांची स्थायी संपत्ती स्वत: संपादित केल्याचे दाखविले आहे. त्यांनी स्वत: मिळविलेल्या स्थायी संपत्तीची आजच्या बाजारपेठेनुसार किमत ६१ लाख ८७ हजार ५०० रूपये आहे. त्यांच्या इनहेरिटेड संपत्ती ६१ लाख ९३ हजाराची तर पत्नीच्या नावे ४ लाख ७५ हजार रूपयांच्या संपत्तीचा समावेश आहे. तसेच त्यांनी स्वत:च्या नावे ६० लाख ४५ हजार ३०७ व ५ लाख ५६ हजार ५०८ रूपये व पत्नीच्या नावे १७ लाख ९० हजार रूपयांचे कर्ज दाखविले आहे. बहुजन समाज पक्षातून निवडणूक लढविणारे योगेश बन्सोड यांनी सन २०१३-१४ मध्ये स्वत:च्या नावे २ लाख ६२ हजार ५१० रूपये व पत्नीच्या नावे २ लाख ४९ हजार ३६० रूपये असल्याचे दाखविले आहे. त्यांच्या नावे ११ लाख ८४ हजार ५०० रूपयांची व पत्नीच्या नावे ७ लाख १२ हजार ५०० रूपयांची अस्थायी संपत्ती आहे. तर त्यांनी ९ लाख रूपयांची स्थायी संपत्ती स्वत: व पत्नीच्या नावे २५ लाख रूपयांची संपत्ती संपादित केल्याचे दाखविले आहे. त्यांची वारसाप्राप्त संपत्ती सात लाख रूपयांची आहे. त्यांच्या स्वत:च्या नावे ३ लाख ७५ हजार रूपयांचे व पत्नीच्या नावे ३ लाख ४० हजार रूपयांचे बँक व इतर संस्थाचे कर्ज असल्याचे दाखविले आहे. (प्रतिनिधी)
गोंदियातील सर्व प्रमुख उमेदवार कोट्यधीश
By admin | Updated: September 30, 2014 23:37 IST