लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आहे. यावर आळा बसावा म्हणून सर्वत्र संचारबंदी असून लॉकडाऊन सुरू आहे. अशाही परिस्थितीमध्ये दारूची तस्करी करणारे गप्प बसताना दिसत नाही. अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करीत असलेली पांढऱ्या रंगाची टोयाटो क्वालीस चार चाकी वाहन अर्जुनी-मोरगाव पोलीसांनी पकडले. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दाभना रोडवर सोमवारी (दि.३०) रात्री १० वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दोघा जणांना ताब्यात घेऊन चारचाकी वाहनासह १ लाख ९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली असून १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे व्यवहार ठप्प पडले आहेत.अशामध्ये दाम दुप्पटीने पैसा घेऊन दारू विक्री करण्यासाठी दारूची तस्करी करणारे नवनवीन शक्कल वापरतात. अर्जुनी-मोरगाव येथील दाभना रोडवरील साईनाथ पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी उभी असून त्यात दारूच्या पेट्या आहेत. अशी गुप्त माहिती एका खबऱ्याकडुन सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भुरे यांना मिळाली. पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भुते, पोलीस शिपाई राहुल चिचमलकर,महेंद्र सोनवाने, श्रीकांत मेश्राम घटनास्थळी गेले असता टोयाटो क्वालीस एमएच ३१/एएच-३०७० चारचाकी वाहन उभे होते.त्यात दोघेजण बसले होते. गाडीची तपासणी केली असता त्यात देशी दारू संत्री नावाची लेबल असलेले ४५ नग (७५० एमएल) आढळून आले.विना परवाना देशी दारु बाळगल्यावरून तेजाबसिंग कचनसिंग रामगडे (२६ वर्ष), राजू रामदास कोटरंगे (३७ वर्ष) दोन्ही राहणार लाखांदूर यांना ताब्यात घेण्यात आले. ९ हजार ७२० रूपयांची देशी दारू व १ लाख रूपयाची चारचाकी वाहन असा मुद्देमाल जब्त करून सदर आरोपी विरोधात कलम ६५(ई),७७(अ),८३ मदाका अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास ठाणेदार तोंदले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भुते करीत आहेत.
लॉकडाऊनमध्ये दारुची तस्करी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST
अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करीत असलेली पांढऱ्या रंगाची टोयाटो क्वालीस चार चाकी वाहन अर्जुनी-मोरगाव पोलीसांनी पकडले. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दाभना रोडवर सोमवारी (दि.३०) रात्री १० वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दोघा जणांना ताब्यात घेऊन चारचाकी वाहनासह १ लाख ९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लॉकडाऊनमध्ये दारुची तस्करी सुरूच
ठळक मुद्देलाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त: अर्जुनी मोरगाव पोलिसांची कारवाई