परसवाडा : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून बोंडरानी शिवारात वैनगंगा नदी पात्रात एक लाख ९१ हजार रुपये किमतीचा ३०४० किलो सडवा मोहाफुल, तसेच सहा लाख चार हजार रुपये किमतीचा १ ब्रास रेती भरलेले ट्रॅक्टर, असा आठ लाख तीन हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत, विनोद गजानन बिजेवार (रा.रतनारा) याच्याकडून दोन हजार १०० रुपयांची २१ लिटर दारू, तुकडुदास हिरामण बागडे (५०, रा. पिपरिया) याच्याकडून दोन हजार २०० रुपये किमतीची २२ लिटर दारू, सुंदर हरिदास चत्रे (४५,रा.लोधिटोला) याच्याकडून एक हजार ३८० रुपये किमतीचे देशी दारूचे २३ पव्वे, बाळकृष्ण रामू मेश्राम (रा.पिपरिया) याच्याकडून एक हजार रुपये किमतीची १० लिटर मोहाफुल दारू, सोहन बागळे (रा. दवनीवाडा) याच्याकडून एक हजार ५०० रुपये किमतीची १५ लिटर दारू, रंगलाल पारधी (२२) व रजनीकांत कुवरलाल सोनेवाने (२८, रा. सेजगाव) याच्याकडून सहा लाख चार हजार रुपये किमतीची १ ब्रास रेती भरलेली ट्रॅक्टर-ट्राली जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दवनीवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नीलेश उरकुडे, पोलीस हवालदार प्रताप पटले, खंडाते, कानेकर, भुरे, पारधी, नायक धनेश्वर पिपरेवार, कल्पेश चव्हाण, बुधराम डोहळे, तुरकर, टेभेंकर यांनी केली.