शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

निर्मल करण्याचे उद्दिष्ट डिसेंबरपर्यंत गाठा

By admin | Updated: February 24, 2016 01:42 IST

एक माणूस जग बदलू शकतो. मनापासून कार्य केले तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही. स्वच्छतेच्या बाबतीत जगातल्या दहा गलीच्छ देशात आपल्या देशाचा समावेश आहे.

पुराम यांचे आवाहन : १०७ ग्रामसेवकांची शौचालय बांधकामासाठी आढावा बैठक गोंदिया : एक माणूस जग बदलू शकतो. मनापासून कार्य केले तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही. स्वच्छतेच्या बाबतीत जगातल्या दहा गलीच्छ देशात आपल्या देशाचा समावेश आहे. ही बाब फार लाजीरवाणी आहे. देशाला निर्मल करण्यासाठीे ग्रामसेवकांनी वैयक्तीक शौचालय बांधकाम व त्याचा वापरावर भर देवून डिसेंबर अखेरपर्यंत नियोजित उद्दिष्ट गाठण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम यांनी केले. स्थानिक जिल्हा परिषद सभागृहात मंगळवारी जिल्ह्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. पुराम म्हणाले की, वर्तमानात कार्य केले तर भविष्य चांगले होते. शासन आपल्याला सर्वकाही देते, याची जाणीव ठेवा. आपण ज्या लोकांसाठी कार्य करतो ते आपले बांधवच आहेत. त्यामुळे जीव ओतून कार्य करा. नियोजित उद्दिष्ट साध्य करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. ग्रामसेवकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाहीसुध्दा त्यांनी याप्रसंगी दिली. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील आठही पंचायत समिती अंतर्गत ३१ हजार ६२८ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. वार्षिक कृती आराखड्यात समाविष्ट तथा कृती आराखड्यात समाविष्ट नसलेल्या ग्रामपंचायतीमध्येसुध्दा वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करता येते. वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्यात येतो. याप्रसंगी प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय बांधकामाचा आढावा घेण्यात आला. ग्रामसेवकांनी त्यांच्या ग्रामपंचायतचे उद्दिष्ट, आतापर्यंत पूर्ण झालेले बांधकाम तथा शिल्लक बांधकामाचे नियोजन सादर केले. केवळ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करूनच चालणार नाही, तर त्याचा वापर व्हायला पाहिजे. पूर्ण झालेल्या बांधकामाचे आॅनलाईन करण्याचे निर्देशसुध्दा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम यांनी याप्रसंगी दिले. दरम्यान, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण, तालुकाध्यक्ष पृथ्वीराज कोल्हटकर यांनी नियोजित कालावधीत शौचालयांचे बांधकाम करण्याची ग्वाही देऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानले. याप्रसंगी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सर्व तज्ज्ञ सल्लागार उपस्थित होते. (प्रतिनिधी)