शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग म्हणते जिल्ह्यात १०१ टक्के रोवणी

By admin | Updated: August 30, 2014 01:47 IST

यंदा पावसाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. असे असतानाही मात्र खरीपाचा हंगाम कसण्यासाठी शेतकरी ...

गोंदिया : यंदा पावसाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. असे असतानाही मात्र खरीपाचा हंगाम कसण्यासाठी शेतकरी कंबर कसून शेतात उतरले होते. त्यामुळेच जिल्ह्यात आतापर्यंत १०१ टक्के रोवण्या उरकल्या आहेत. कृषी अधिक्षक कार्यालयाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात सर्वसाधारण लागवड क्षेत्रा पेक्षा दोन हजार ७६७ हेक्टर जास्त क्षेत्रात रोवणी झाली आहे. रोवणीची ही स्थिती उत्तम असताना पिकांवर मात्र अळी, करपा व खोडकिड्याचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचेही कळले. गारपिटीने रब्बीचा हंगाम कसा-बसा निघाल्याने शेतकरी दु:खी होता. त्यामुळे खरिपाचा हंगाम सर करायचाच अशी गाठ बांधून शेतकरी तयारीला लागला होता. मात्र मृग कोरडा गेल्याने शेतकऱ्यांचे नियोजन बिघडले. उशिरा आलेल्या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरिपाचा हंगाम हाती घेतला. त्यातूनच नेहमीच्या तुलनेत उशिरा का होईना मात्र यंदा जिल्ह्यात १०१ टक्के रोवण्या झाल्याचे कृषी विभागाकडून कळले. जिल्ह्याचे १ लाख ८४ हजार ९०० हेक्टर सर्वसाधारण लागवड क्षेत्र आहे. यंदा मात्र जिल्ह्यात त्यापेक्षा दोन हजार ७६७ हेक्टर जास्त म्हणजेच एक लाख ८७ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रात रोवण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील रोवणीची तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास यात, गोंदिया तालुक्यात ३८ हजार १२५ हेक्टर, तिरोडा ३० हजार ०५५ हे., आमगाव २० हजार २३० हे., सालेकसा १६ हजार १०४ हे., देवरी २१ हजार ०१९ हे., अर्जुनी मोरगाव २२ हजार ६६५ हे. तर सडक अर्जुनी तालुक्यात १८ हजार ३९१ हेक्टर क्षेत्रात रोवण्या करण्यात आल्या आहेत. तर सध्या पाऊस येत असल्याने येत्या १५ दिवस पाऊस नाही आता तरी चालणार असून त्यानंतर मात्र पिकांवर परिणाम जाणवेल असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी ए.एस. भोंगाडे यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)