शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीशास्त्र सर्व शास्त्रांची जननी आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 21:45 IST

शेतकऱ्यांनी पीक विमा केला पाहिजे, जसे मानवाला जीवन विम्याची गरज आहे. तशीच गरज पीक विम्याची आहे. शेतातील माती परीक्षण केल्याशिवाय खताची मात्रा देवू नये, शेत पिकावर आलेल्या किड व रोगांचे योग्य निदान करुनच किटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी. शेती शास्त्र हे सर्व शास्त्रांची जननी असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले.

ठळक मुद्देराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : शेतकरी व क्षेत्रीय कर्मचारी प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : शेतकऱ्यांनी पीक विमा केला पाहिजे, जसे मानवाला जीवन विम्याची गरज आहे. तशीच गरज पीक विम्याची आहे. शेतातील माती परीक्षण केल्याशिवाय खताची मात्रा देवू नये, शेत पिकावर आलेल्या किड व रोगांचे योग्य निदान करुनच किटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी. शेती शास्त्र हे सर्व शास्त्रांची जननी असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले.शेतकरी व क्षेत्रिय कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम देवरी येथील मंगल कार्यालयात शनिवारी घेण्यात आला. देवरी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सडक- अर्जुनी, देवरी, आमगाव व सालेकसा या ४ तालुक्यातील कृषी सेवा केंद्र, शेतकरी मित्र व कर्मचारी, अधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. माजी बालकल्याण सभापती सविता पुराम याच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, हिवरा कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्र विषतज्ज्ञ आर.डी. चव्हाण, धान संशोधन केंद्र साकोलीचे डॉ. जी.आर. शामकुवर, सालेकसाचे तालुका कृषी अधिकारी एस.व्ही.भोसले, मंडळ कृषी अधिकारी काशीनाथ मोहाळीकर, जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी बाळासाहेब गिरी, तालुका कृषी अधिकारी लखन बन्सोड, डॉ. किशोर पात्रीकर, मंडळ अधिकारी चंद्रभान आकरे उपस्थित होते.डॉ.शामकुवर यांनी, जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करुन खताची मात्रा द्यावी. ठोकळ धानापेक्षा बारीक धानाच्या प्रजातीवर किडरोगांचा प्रादुर्भाव अधिक होतो. त्यामुळे याकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देण्यास सांगितले. तोडसाम यांनी, कृषी केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांना किडरोगाचा योग्य निदान लावूनच किटकनाशकाची मात्रा द्यावी, अवाजवी किटकनाशके देवू नये असे सांगितले.पुराम यांनी, कृषी मेळाव्यांमुळे कृषी केंद्र संचालकांना, शेतकऱ्यांना व कृषी मित्रांना किड व रोगाच्या व्यवस्थापनाची माहिती मिळाल्याने किड व रोगाचे नियंत्रण करण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सानिध्यात राहून किड व रोगाची माहिती जाणून घ्यावी. शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे सांगितले.मेळाव्याला सडक-अर्जुनी, देवरी, आमगाव व सालेकसा येथील कृषी मित्र, कृषी सेवा केंद्र संचालक, महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते. संचालन बन्सोड यांनी केले. आभार जी.जी. तोडसाम यांनी मानले.