शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

७ जुलैपर्यंत कृषी जागृती सप्ताह

By admin | Updated: July 2, 2015 01:50 IST

शेतकऱ्यांची निराशा दूर करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी विभागासह प्रत्यक्ष जोडून त्यांना कृषीसह इतर पूरक व्यवसायांची माहिती देण्यासाठी राज्य शासनाने ....

गोंदिया : शेतकऱ्यांची निराशा दूर करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी विभागासह प्रत्यक्ष जोडून त्यांना कृषीसह इतर पूरक व्यवसायांची माहिती देण्यासाठी राज्य शासनाने कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य विभागाच्या वतीने १ ते ७ जुलैपर्यंत कृषी जागृती सप्ताह आयोजित केला आहे.कृषी विकास दरात वाढ करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु राज्यात मागील काही वर्षांपासून कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार पीक झाले नाही. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. या सप्ताहात शेतकऱ्यांना कृषीविषयी विविध उपक्रमांची माहिती देण्यात येईल. तसेच केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या शेतकरी हिताच्या योजनांच्या बाबत सांगण्यात येईल. राज्यात कृषी विश्वविद्यालय, केंद्रीय कृषी संशोधन संस्थेद्वारे विकसित केलेले आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम तालुका स्तरावरही आयोजित केले जात आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक, उपक्रमांचे नियोजन व क्रियान्वयन करण्यात राज्याच्या कृषी विश्वविद्यालय व त्याअंतर्गत येणारे संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, सर्व कृषी महाविद्यालय, कृषी तंत्रनिकेतन, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, महाबीज, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ, वखार महामंडळासह कृषीशी संबंधित विभागांनी सहकार्य करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. ग्राम स्तरावर शेतकरी मित्र, कृषी समुहाचे प्रतिनिधी व कृषीबाबत उत्पादन घेणाऱ्या कंपनींचे प्रतिनिधी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य कार्यक्रमांत सहभागी होतील. या सप्ताहादरम्यान आयोजित कार्यक्रमांसाठी वेगळ्या निधीची तरतूद नसल्यामुळे विविध योजनांसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीतूनच सदर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यापूर्वीसुद्धा मागील खरीप हंगामाची सुरूवातीला असा प्रकारचे उपक्रम राज्यासह जिल्ह्यातसुद्धा आयोजित करण्यात आले होते. त्याअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर व शैक्षणिक सहलीचेही आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)