शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

एजंसीच्या माध्यमातून सुरू आहे वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:16 IST

शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत नगर परिषदेला यंदा चार हजार ७०० वृक्षलागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. असे असताना नगर परिषदेकडून पाच हजार २०० खड्डे खोदण्यात आल्याचे सांगीतले जात आहे.

ठळक मुद्दे१२०० झाडे लावल्याची माहिती : टार्गेट ४७०० वृक्षलागवडीचे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत नगर परिषदेला यंदा चार हजार ७०० वृक्षलागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. असे असताना नगर परिषदेकडून पाच हजार २०० खड्डे खोदण्यात आल्याचे सांगीतले जात आहे. विशेष म्हणजे, वृक्षलागवडसाठी खड्डे खोदण्याचे काम देण्यात आलेल्या एजंसीकडूनच आता वृक्षलागवड करवून घेतली जात असून अद्याप एक हजार २०० रोपट्यांची लागवड झाल्याचे सांगीतले जात आहे.यंदा नगर परिषदेला चार हजार ७०० रोपट्यांचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार नगर परिषदेकडून खड्डे खोदण्याचे काम करण्यात आले.यासाठी संबंधितांनी नगर परिषदेतील वादग्रस्त एजंसीलाच खड्डे खोदण्याचे काम देवून आपुलकी दाखवून दिली. चार हजार ७०० रोपट्यांचे टार्गेट असताना वृक्षलागवडसाठी आतापर्यंत पाच हजार २०० खड्डे खोदण्यात आल्याची माहिती अभियंता खापर्डे यांनी दिली. त्यातल्या त्यात आता वृक्ष लागवडीचे कामही त्याच एजंसीला देऊन टाकले आहे.आता अर्धा महिना लोटला असून आतापर्यंत एक हजार २०० रोपटी लावण्यात आल्याचेही सांगीतले जात आहे. यासाठी पांगडी येथील वन विभागाच्या नर्सरीतून पाच हजार २०० रोपटी मागविण्यात आली आहे. मागील कित्येक वर्षांपासून नगर परिषदेने दिलेले टार्गेट कधीच सर केलेले नाही. त्यात यंदा दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त खड्डे खोदून वृक्ष लागवड करण्याचा पराक्रम नगर परिषद दाखवित असल्याने शंका व्यक्त केली जात आहे.वृक्ष लावगडीचा २.९० कोटींचा प्रस्ताववृक्षलागवड अभियानाला घेऊन संबंधिताने १४ व्या वित्त आयोगातून २.९० कोटींचा एक प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्याची माहिती आहे. यांतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागात वृक्षलागवडी करून त्यांना ट्री-गार्ड, खोदकाम, संवर्धनाचे काम एजंसीला दिले जाणार आहे. यासाठी निविदा बोलाविली जाणार असून ज्या एजंसीला हे काम जाईल त्यांना एक वर्ष झाडांची देखभाल करावयाची असून ११ हजार २०० झाडे लावण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे, आता या नव्या प्रयोगात कोणता नवा चमत्कार होतो का याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.