शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आगळा वेगळा विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 21:50 IST

शहरात गुढीपाडवा, मराठी नविन वर्षाच्या पर्वावर, रविवारी (दि.१९) एक अनोखा व आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला.

ठळक मुद्देलग्नाच्या सुरूवातीला राष्ट्रगीत : रोपटे व पुस्तके देऊन वऱ्हाड्यांचे स्वागत

डी.आर.गिरीपुंजे ।आॅनलाईन लोकमततिरोडा : शहरात गुढीपाडवा, मराठी नविन वर्षाच्या पर्वावर, रविवारी (दि.१९) एक अनोखा व आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याने सर्व समाजबांधवापुढे आदर्श ठेवला असून लग्न सोहळ्यावर केल्या जाणाऱ्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीवर विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे तिरोडा शहरात सध्या एक विवाह ऐसा भी याची चर्चा आहे.प्रो. हितेशकुमार पटले व वधू इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली येथील वरीष्ठ सहायक योगीता पारधी यांनी मात्र आपल्या आई-वडीलांना व नातेवाईकांना विश्वासात घेत एक आगळा-वेगळा विवाह लावून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला. हे लग्नकार्य केवळ एकाच दिवसात संपले त्यामुळे वेळ व पैशाची बचत झाली.लग्नात वधू माता-पित्यांना खूप खर्च करावा लागतो. परंतु इथे वधुला वराच्या मंडपात आणून कुठलाही खर्चात न लागू देता विवाह पार पडला. लग्नाला डी.जे., बॅन्ड, घोडा केला नाही, ध्वनीप्रदूषण टाळले तर सकाळी लग्न ठेवून विजेची रोषणाई टाळली. लग्नाची सुरुवात राष्ट्रगीत जनगण मन ने केली नंतर मंगलाष्टके म्हणून लग्न पार पाडले. लग्न लागताच अक्षता (तांदूळ-ज्वारी) चा वर्षाव केला जातो.मंगलाष्टके पूर्ण होताच टाळ्यांच्या गडगडाटात लग्न सोहळा पार पडला ना अक्षता, ना फुले, ना फटाके इथे शांततामय वातावरणात विवाह पार पडला. सुलग्न सुरु झाले. त्यातून मिळणाºया पैशाचा उपयोग अनाथाश्रमाला देण्याचा निर्णय वधू-वरांनी घेतला. लग्न अगदी वेळेवर १२ वाजता लावून वेळेचे महत्व पटवून दिले.लग्नानंतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनलग्नानंतर लगेच प्रबोधनपर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.यात संजय नाथे यांनी लग्नाचे प्रकार सांगून सोईस्कर कमी वेळात, कमी खर्चात लग्न कसे करता येईल हे स्वत:च्या लग्नाचे उदाहरण देवून सांगितले. त्यानंतर युवकांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी हे सांगितले. सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शिशुपाल पटले यांनी अनावश्यक खर्चाची व वेळेची कशी बचत केली हे सांगितले.