शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पुन्हा बरसला

By admin | Updated: April 6, 2016 01:49 IST

मागच्या आठवड्यात दमदार हजेरी लावल्यानंतर अवकाळी पावसाने सोमवारी (दि.४) जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली.

आमगाव तालुक्यात सर्वाधिक : काही ठिकाणी झाली गारपीट गोंदिया : मागच्या आठवड्यात दमदार हजेरी लावल्यानंतर अवकाळी पावसाने सोमवारी (दि.४) जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली. विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी बरसला. यात गोरेगाव, सालेकसा व आमगाव तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. विशेष म्हणजे वादळी वाऱ्याने घरावरचे व टपऱ्यांचे छत उडून काही भागांत नुकसान झाल्याचीही माहिती आहे. दुपारपासून वादळी वातावरणासह सायंकाळी अचानक वाऱ्याने हजेरी लावली. त्यानंतर रात्री पाऊस बरसला. जिल्ह्यात गोंदियासह तिरोडा, अर्जुनी-मोरगाव व देवरी तालुक्यांत पावसाचे थेंब पडले. तर गोरेगाव, सालेकसा, आमगाव व सडक- अर्जुनी तालुक्यात चांगलाच पाऊस बरसल्याची नोंद आहे. या पावसामुळे काही भागात घरे व टपऱ्यांवरचे छत उडाल्याची माहिती आहे. सोमवारी बरसलेल्या या पावसात आमगाव तालुक्यात सर्वाधीक ९.३ मिमी पाऊस बरसल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे शहरात मंगळवारी (दि.५) सकाळपासून वादळी वातावरण होते व वारा सुरू होता. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे सायंकाळी गारांसह चांगला पाऊस बरसला. या अवकाळी पावसामुळे मात्र रबी पिकांना धोका निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)वादळी वाऱ्याचा फटका सालेकसा- वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील ग्राम लटोरी येथील आेंकारदास मिथलादास निंबार्क यांच्या घरावर शेजारच्या घराचे टीनाचे शेड व इतर साहीत्य धडकल्याने कौलारू घराचे मोठे नुकसान झाले आहे.ओंकारदास यांचे कौलारू घर असून त्यांच्या शेजारच्या घरावरचे टीनचे शेड, लोखंडी पाईप व अन्य साहीत्य वादळी वाऱ्याच्या धडाक्यात निघून गेले व ओंकारदास यांच्या घरावर पडले. त्यामुळे घरावरील केवलू फुटले. एवढेच नव्हे तर कवेलू खालील शिवारसुद्धा तुटले. त्यामुळे ओंकारदास यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कवेलू फुटल्याने पावसाचे पाणीसुद्धा घरात शिरले. त्यामुळे घरातील वस्तूही खराब झाल्या.