शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसामुळे घात

By admin | Updated: October 9, 2016 00:43 IST

‘पोळा आणि पाऊस झाला भोळा’ असे आधी म्हटले जात होते. पण यावर्षी पोळा संपून पावसाचे दिवसही संपले असताना ..

धानाचे नुकसान : शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला जाणारगोंदिया : ‘पोळा आणि पाऊस झाला भोळा’ असे आधी म्हटले जात होते. पण यावर्षी पोळा संपून पावसाचे दिवसही संपले असताना पावसाने पिच्छा सोडलेला नाही. आता हलका धान ऐन कापणीवर असताना काही भागात पावसाने थैमान घातल्यामुळे हाती येत असलेला धान वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविल्या जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.सौंदड शिवारातील शेतकरी चिंतेतसौंदड : सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली. पावसाबरोबर वादळी वारे असल्याने हलक्या धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. एक हजार दहा, पाटरु, आर.पी.एन., एक हजार एक या जातीच्या धानाचे आणि फुलोऱ्यावर पडलेल्या जोराच्या पावसाने फुलोरा झाडून टाकला. तसेच आलेले धान जमिनीवर लोळत पडल्याने धान फोल होण्यासोबत त्याला अंकुर फुटण्याची शक्यता निर्माण झाली नाही. पावसाने आठवडाभर उसंत दिल्यास हलक्या जातीच्या धानाच्या कापणीला सुरुवात होईल. मात्र वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेल्या धानपिकाची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचे धान मळणीनंतर फेडरेशनच्या मार्फत शासनाने व्यापाऱ्यांच्या घशामध्ये न घालता लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. (लोकमत चमू)इटियाडोह धरण ओव्हरफ्लो होणार?गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेले इडियाडोह धरण गेल्या दोन ३ वर्षांपासून ओव्हरफ्लो झाले नाही. गेल्यावर्षी तर हे धरण ४० टक्केही भरले नव्हते. त्यामुळे रबी हंगामात पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला होता. यावर्षीसुद्धा सप्टेंबर अखेरपर्यंत हे धरण भरण्याची शाश्वती नव्हती. मात्र आॅक्टोबर महिन्यातही अधूनमधून पाऊस सुरूच असल्यामुळे हे धरण ९७ टक्के भरले आहे. शनिवारच्या सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे पाऊस असाच सुरू राहिला तर हे धरण दोन दिवसात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हलक्या धानाचे नुकसानपांढरी : यावर्षी सर्वच शेतामधील हलके धान्य बहरलेले आहे. आठ ते दहा दिवसामध्ये धान कापणीवर येणार आहे. त्यापूर्वीच पावसाच्या फटकामुळे धान जमीनदोस्त होत आहे. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना धानाचा फटका बसताना दिसत आहे. पूर्वीपासूनच शेतकरी कर्जाचा बोझे घेवून कसेबसे शेतकरुन आपली उपजिविका करण्याचा प्रयत्न करतो. परंतु नैसर्गिक बाबीमुळे मात घालताना दिसत आहे. शासनाने झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करुन भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.