शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गोदामातील धानाचे वजन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:03 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सालेकसा तालुक्यात सहकारी संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा गोदामात तब्बल ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार करण्यात आली. यानंतर जिल्हा प्रशासन आणि मार्केटिंग फेडरेशनने चौकशीला सुरूवात केली.

ठळक मुद्देसालेकसा तालुक्यातील प्रकरण : मार्केटिंग फेडरेशनकडे नजर, चौकशी सुरू, जिल्हाधिकाऱ्यांना देणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सालेकसा तालुक्यात सहकारी संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा गोदामात तब्बल ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार करण्यात आली. यानंतर जिल्हा प्रशासन आणि मार्केटिंग फेडरेशनने चौकशीला सुरूवात केली. गोदामात नेमके किती धान कमी आहे याचे वजन करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी चौकशी समितीने जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली होती.त्यांनी बुधवारी (दि.८) याला मंजुरी दिली असून आता मार्केटिंग फेडरेशनच्या मंजुरीनंतर धानाचे वजन केले जाणार आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. यासाठी दोन्ही विभागाने यंदा जिल्ह्यात १०० धान खरेदी केंद्र सुरू केले होते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन सहकारी संस्थाशी करार करुन त्यांच्या माध्यमातून धान खरेदी करते.यातंर्गत सालेकसा तालुक्यातील सहकारी संस्थेने यंदा १ लाख ४० हजार क्विंटल धान खरेदी केली होती. यापैकी ७९ हजार क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल करण्यात आली. त्यामुळे सहकारी संस्थेच्या गोदामात ६१ हजार क्विंटल धान शिल्लक असणे आवश्यक होते. मात्र संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.तक्रारीची दखल घेत याची खातजमा करण्यासाठी चौकशी समिती गठीत करुन चौकशी करण्याचे आदेश दिले. मुंबई येथील मार्केटिंग फेडरेशनचे महासंचालक कोक आणि भंडाराचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी खर्चे यांनी गोंदिया येथे पोहचून संपूर्ण खरेदी प्रक्रियेची चौकशी केली.तसेच सालेकसा येथील सहकारी संस्थेच्या गोदामाला भेट देऊन पाहणी केली. मात्र गोदामात नेमके धान कमी किंवा बरोबर आहे हे धानाचे वजन केल्याशिवाय कळू शकत नाही. त्यामुळे गोदामातील संपूर्ण धानाची उचल करुन त्याचे वजन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी चौकशी समितीने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना पत्र लिहून केली.जिल्हाधिकाºयांनी बुधवारी (दि.८) याला मंजुरी दिली.आता मार्केटिंग फेडरेशनची मंजुरी मिळताच धानाची उचल करण्यास सुरूवात केली जाणार असल्याचे चौकशी समितीच्या सदस्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.चौकशी किती दिवस चालेल ?सालेकसा तालुक्यातील सहकारी संस्थेच्या गोदामातील धानाचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. प्रत्यक्षात ५० हजार क्विंटल धान कमी असल्यास हा घोळ कोट्यवधी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. मात्र जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तर्कविर्तक लावणे चुकीचे आहे. तर धानाची उचल करुनच धान कमी आहे की बरोबर आहे हे कळणार आहे. त्यामुळे नेमकी ही चौकशी किती दिवस चालेल हे सांगता येणार नसल्याचे चौकशी समितीने सांगितले.इतर गोदामातील धानाचे काय?केवळ सालेकसा तालुक्यातील सहकारी संस्थेच्या गोदामात कमी धान असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने चौकशीला सुरूवात केली आहे. मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे जिल्ह्यात अनेक ठिकाणी गोदाम असून या गोदामातील धान खरेदी ऐवढेच आहे किंवा नाही याची खातरजमा कशी करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.केंद्र आणि गोदामांना सीसीटीव्ही कॅमेरे का नाहीशासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची अफरातफर व चोरी होवू नये तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून याची अंमलबजावणी केली जात नाही. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकडे का दुर्लक्ष केले जात असा सवाल उपस्थित केला जात आहे.नियंत्रण नेमके कुणाचे ?जिल्ह्यातील सहकारी संस्था जिल्हा मार्केटिंग फेडरेशनसह करार करुन धान खरेदी करते. खरेदी केलेला धान भरडाईसाठी उचल होईपर्यंत गोदामात ठेवते. मग यासर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे काम नेमके जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे की कुणाचे आहे हा प्रश्न देखील अनुउत्तरीत आहे. 

टॅग्स :Marketबाजार