लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जवळच्या सिलेझरी येथील भारतीय स्टेट बँक शाखा सानगडीच्या नियंत्रणाखाली असलेल्या ग्राहक सेवा केंद्रात ग्राहकांच्या खात्यामधून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने हजारो ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.ग्राहकांनी संबंधिताना तक्रार करुन केंद्र संचालकाचा फसवणुकीचा प्रकार लक्षात आणून दिला. त्यावरुन जिरो मास फाऊंडेशनने ग्राहक केंद्राची ९ तारखेला आयडी बंद केली. तर रविवारी(दि.२३) सानगडी शाखेच्या शिपायाने सिलेझरी ग्राहक सेवा केंद्राच्या नावावर पुर्णत: काळे पेंट मारुन मिटविले. अखेर ग्राहक सेवा केंद्र कुलूपबंद झाले.ग्राहक सेवा केंद्र चालविणारे दुर्वेश ब्राम्हणकर यांनी सिलेझरी गावात भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र मागील ५-६ वर्षापूर्वी सुरु केले. अल्पावधीतच आपली पत निर्माण करुन ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात दुर्वेशने यश मिळविले होते. ग्राहकांनी आपला दैनंदिन व्यवहार करुन लाखो रुपयाच्या ठेवी ग्राहक सेवा केंद्रामध्ये जमा करु लागले. दिवसेंदिवस आर्थिक व्यवहारात वाढ होत गेली.आॅनलाईनद्वारे पैसे काढताना ग्राहकांना त्याची माहिती घेऊन देता कमी पैशाची नोंद ग्राहकांच्या पासबुकमध्ये करण्याचा सपाटा केंद्र संचालकांने राबविला. ग्राहक सेवा केंद्रामध्ये लाखोंचा अपहार झाल्याची बाब पुढे आली. रविवारी (दि.२३) सकाळीच सानगडी येथील भारतीय स्टेट बँकेचा एक कर्मचारी सिलेझरी येथे येवून ग्राहक सेवा केंद्राच्या नामफलकावर काळा पेंट मारुन मिटविले.सामान्य, मजूर, ग्राहकांवर संकटग्राहक केंद्रामध्ये रोज कमविणाऱ्या, कामावर जाणाºया कष्टकºयांचे खात्यामधूनच लाखो रुपये लंपास झाल्याने त्यांचेवर सर्वाधिक संकट ओढवले आहे. पासबुकवर नोंद आहे ती रक्कम मागण्यासाठी शेकडो ग्राहक केंद्र संचालकाकडे धाव घेतात, परंतु केंद्र चालविणारे ब्राम्हणकर गावात नसल्याची ओरड आहे.
अखेर ग्राहक सेवा केंद्र कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 21:58 IST
जवळच्या सिलेझरी येथील भारतीय स्टेट बँक शाखा सानगडीच्या नियंत्रणाखाली असलेल्या ग्राहक सेवा केंद्रात ग्राहकांच्या खात्यामधून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने हजारो ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.
अखेर ग्राहक सेवा केंद्र कुलूपबंद
ठळक मुद्देग्राहकांच्या रकमेचा अपहार : नामफलक मिटविले