शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

१५ वर्षांनंतर जिल्ह्याला मंत्रिपद

By admin | Updated: December 6, 2014 01:49 IST

नव्याने सत्तारूढ झालेल्या राज्यातील युती सरकारमध्ये गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून अर्जुनी मोरगावचे आमदार राजकुमार बडोले यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून ...

गोंदिया : नव्याने सत्तारूढ झालेल्या राज्यातील युती सरकारमध्ये गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून अर्जुनी मोरगावचे आमदार राजकुमार बडोले यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गोंदिया, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, देवरीसह ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.आ. बडोले यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार याची कुणकुण कालपासूनच लागली होती. मात्र शुक्रवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. दुपारी ४.३० च्या सुमारास बडोले शपथग्रहण करतानाचे लाईव्ह चित्रण वृत्तवाहिन्यांवरून पाहताच कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.राजकारणात नवीन तरीही वरिष्ठ आमदारयावेळी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील ७ पैकी ६ जागी भाजपचे आमदार निवडून आले आहेत. त्यात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकी तीन आमदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या ६ पैकी ५ आमदार हे पहिल्यांदाच विधानसभेवर निवडल्या गेले आहेत. त्यापैकी राजकुमार बडोले हे सलग दुसऱ्या वेळी निवडून आलेले एकमेव आमदार आहेत. त्यामुळे सध्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील ते भाजपचे वरिष्ठ आमदार आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना भाजप नेते नितीन गडकरी यांच्या सांगण्यावरून २००९ मध्ये जिल्हा परिषदेत शाखा अभियंत्याची नोकरी सोडून ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि आमदार झाले. यावेळच्या निवडणुकीत पुन्हा मतदारांनी आमदारकीची माळ बडोले यांच्या गळ्यात टाकली. (जिल्हा प्रतिनिधी)