शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

११ व्या यादीनंतरही २५ हजार शेतकरी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:12 IST

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत मागील वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. यात जिल्ह्यातील ९० हजारावर शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आत्तापर्यंत ६३ हजार ६०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

ठळक मुद्देसाडेचार हजार शेतकऱ्यांचा समावेश : आतापर्यंत ६३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत मागील वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. यात जिल्ह्यातील ९० हजारावर शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आत्तापर्यंत ६३ हजार ६०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर नुकतीच बँकांना कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ४ हजार ४४६ शेतकऱ्यांची अकरावी ग्रीन यादी प्राप्त झाली आहे.यानंतरही कर्जमाफीस पात्र ठरलेले २५ हजार शेतकरी वेटिंंगवर आहेत. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या आॅनलाईन अर्जांची पडताळणी करुन त्याची येलो, ग्रीन आणि रेड अशा याद्या तयार करुन विभागणी केली जात आहेत. ग्रीन यादी ही अंतीम यादी असून यातील पात्र लाभार्थी शेतकºयांच्या कर्ज खात्यात कर्जाची रक्कम जमा केली जात आहे.शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील ९० हजारावर शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आत्तापर्यंत ६३ हजार ६०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून त्यांच्या बँक खात्यावर १५८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे.जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँका आत्तापर्यंत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना एकूण १० ग्रीन याद्या प्राप्त झाल्या आहेत. तर मंगळवारी (दि.२३) ४४४६ शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या शेतकऱ्यांची ११ वी ग्रीन यादी प्राप्त झाली. तसेच या शेतकºयांचे कर्ज खाते शून्य करण्यासाठी ११ कोटी ८६ लाख रूपयांचा निधी सुध्दा जिल्हा बँकेला प्राप्त झाला आहे.लवकरच सदर रक्कम पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करुन त्यांचे कर्ज खाते शून्य करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.प्रतीक्षा कायमजिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या एकूण शेतकºयांपैकी आत्तापर्यंत ६३ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. तर अजून जवळपास २५ हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अजून दोन तीन ग्रीन याद्या महाआॅनलाईनकडून येण्याची शक्यता असल्याचे सांगितले.१४ महिन्यानंतरही प्रक्रिया सुरूचशासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा करुन जवळपास १४ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. शासन आणि महाआॅनलाईनकडून रोज नवीन नवीन निकष लावले जात असल्याचे कर्जमाफीच्या प्रक्रियेस विलंब होत आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज